कृषी

Panjabrao Dakh : सावधान ! हवामानात अचानक मोठा बदल ; ‘या’ जिल्ह्यात 10 नोव्हेंबर पर्यंत मुसळधार पाऊस ; वाचा पंजाबरावांचा हवामान अंदाज

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे आहे. दिवसा कडक सूर्यदर्शन आणि रात्री तीव्र थंडी जाणवत आहे. यामुळे राज्यात शेती कामाला वेग आला आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील मुख्य पिकांची हार्वेस्टिंग करत असून शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. सध्या शेतकरी बांधव सोयाबीनची काढणी करत आहेत तसेच कापसाची वेचणी सुरू आहे.

मक्याची देखील हार्वेस्टिंग आणि मळणीची कामे प्रगतीपथावर असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान शेतकरी बांधवांचे डोकेदुखी वाढणार आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस त्राहिमाम माजवणार असल्याचे सांगितले जात आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. पंजाबराव डख यांच्या मते राज्यात 3 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. निश्चितच पंजाबराव डख यांचा हा हवामान अंदाज शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणार आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असून रब्बी हंगामासाठी शेतीची तयारी करत आहेत.

अनेक शेतकरी बांधव शेतमालाची मळणी करून शेतमाल विक्रीसाठी बाजारात देखील घेऊन जात आहे. अशा परिस्थितीत पावसाचे वातावरण बनत असल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढत आहे. निश्चितच अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे पुन्हा एकदा नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक भ्रूदंड देखील सहन करावे लागू शकते. पंजाबराव डख यांच्या मते 3 नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर यादरम्यान राज्यात सांगली सातारा सोलापूर नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे.

साहजिकच या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची अवकाळी पावसामुळे डोकेदुखी वाढणार आहे. पंजाबराव डख यांच्या मते आठ नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी काढणी केलेल्या शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच ऊसतोड कामगारांनी देखील कापसाची शक्यता लक्षात घेऊन आपल्या राहण्याची व्यवस्था करून घेण्याचा सल्ला पंजाब रावांनी दिला आहे.

एकंदरीत यावर्षी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे. आता कुठे पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकरी बांधव सुखावला होता. मात्र पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts