Panjabrao Dakh : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा (Rain) जोर कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र शेतीकामाला मोठा वेग आला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने देखील राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याची माहिती दिली आहे. मात्र असे असले तरी अधूनमधून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची (Monsoon) रिपरिप पाहायला मिळत आहे.
काल रात्री देखील राजधानी मुंबईत पाऊस (Monsoon News) झाला असून पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. भारतीय हवामान विभागाने आज विदर्भात पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने विदर्भासाठी देखील जारी केला आहे. तसेच आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात 26 सप्टेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपल्या शेतीची कामे करून घ्यावीत. कारण की 27 सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.
27 तारखेपासून सुरू होणारा पाऊस 4 ऑक्टोबर पर्यंत राज्यात कायम राहणार आहे. हवामान तज्ञ पंजाबराव यांच्या मते 4 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी अकोला वाशिम औरंगाबाद जालना लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
म्हणजेच 27 तारखेपासून सुरू होणारा पाऊस हा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक बघायला मिळणार आहे. मित्रांनो पंजाब राव यांच्या मते 27 तारखेपासून सुरू होणारा पाऊस रिमझिम स्वरूपाचा राहणार आहे. निश्चितच आगामी काही दिवसात हवामान कोरडे राहणार असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार असून शेती कामाला वेग येणार आहे.