कृषी

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा दिवाळीच्या दिवसातला हवामान अंदाज ! पावसात जाणार का यंदाची दिवाळी का राहणार पावसाची उघडीप? वाचा पंजाबरावांच्या जुबानी

Panjabrao Dakh : आज पासून महाराष्ट्रात समवेत संपूर्ण भारतात दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. खर पाहता कालपासून दिवाळीचा पर्व सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत काल झालेल्या पावसामुळे (Monsoon) यंदाची दिवाळी पावसातच (Monsoon News) जाईल की काय हा मोठा प्रश्न शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या अध्यावत हवामान अंदाजानुसार, आज देखील राज्यात पाऊस (Rain) कायम राहणार आहे.

आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांची काळजाची धडधड वाढत आहे. मित्रांनो खरे पाहता गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्णपणे प्रभावित झाली असून काढण्यासाठी आलेल्या खरीप हंगामातील पिकांची अक्षरशः राखरांगोळी होत आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव आता पावसाच्या उघडीपिची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव यांचादेखील हवामान अंदाज आज सार्वजनिक झाला आहे.

परभणी भूमिपुत्र हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj), आज पासून राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. यामुळे सहाजिकच राज्यात शेती कामाला वेग येणार आहे शिवाय दिवाळीच्या पर्वाला देखील आता एक वेगळीच रौनक राज्यात पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या पार मुळावर उठला होता. यामुळे सोयाबीन, कापूस या खरीप हंगामातील मुख्य पिकांची राखरांगोळी, नासाडी झाली आहे. मात्र आता पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या हवामान अंदाजानुसार आज पासून पावसाची उघडीप राहणार असून थंडीचा जोर वाढणार आहे.

यामुळे निश्चितच शेती कामाला वेग येणार असून रब्बी हंगामातील पिकांसाठी थंडीचे वातावरण पोषक राहणार आहे. यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात भरून काढता येणे शक्य होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts