Papaya Farming: भारतात गेल्या अनेक शतकांपासून शेतकरी बांधव उत्पन्नवाढीचे (Farmer Income) अनुषंगाने फळबाग लागवडीकडे वळले आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांची लागवड करत असतात.
राज्यात फळबाग पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, सिताफळ, जामून, केळी, पपई इत्यादी पिकांची शेती (Papaya Cultivation) केली जाते. अशा परिस्थितीत आज आपण ऑफसीजन मध्ये पपईचे (Papaya Crop) कशा प्रकारे उत्पादन घ्यायचे याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो खरे पाहता, पपई हे एक प्रमुख फळपीक आहे, याची मागणी बाजारात बारा महिने असते. यामुळे पपई शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरत आहे. पपई शेतीची (Farming) सर्वात मोठी विशेषता म्हणजे पपई उत्पादक शेतकरी पपईच्या बागेत आंतरपीक म्हणून इतर भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Agriculture News) करू शकतात.यामुळे शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, पपई फळबाग लागवड करून शेतकरी बांधव लाखो रुपयांची कमाई सहजरीत्या करू शकतात.
पपई लागवडीचे सुधारित तंत्र नेमकं आहे तरी कसं:- मित्रांनो सध्या फळबाग पिकांच्या लागवडीकडे शेतकरी बांधव अधिक प्रमाणात वळला आहे. फळबाग शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे मात्र जर शेतकरी बांधवांनी फळबाग पिकात आंतरपीक घेतले तर निश्चितच त्यांना अतिरिक्त वाढीव उत्पन्न मिळणार आहे.
विशेष म्हणजे आता शेतकरी बांधव फळबाग पिकात आंतरपीक घेऊ लागले आहेत आणि चांगली कमाई देखील त्यांना होत आहे. मित्रांनो पपई लागवडीसोबतच कडधान्य पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न प्राप्त करू शकणार आहेत. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकर्यांना हवे असल्यास ते वाटाणा, मेथी, हरभरा, फ्रेंच बीन्स आणि सोयाबीनची आंतरुपीक घेऊन पपईच्या बागांमधून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात.
पपई शेतीतून मिळणारे उत्पन्न:- जाणकार लोकांच्या मते, प्रत्येक हंगामात पपईच्या झाडापासून 40 किलोपर्यंत फळे येतात. पपईला बाजारात 40 ते 50 रुपये किलो बाजार भाव मिळत असल्याचे शेतकरी नमूद करतात. बाजार भावात चढ-उतार होत असतो मात्र तेजीत चांगला बाजारभाव मिळतो.
जाणकार लोक सांगतात की, एक हेक्टर जमिनीत पपईची सुमारे 2250 रोपांची लागवड करता येते. म्हणजे एका झाडाला 40 किलो पर्यंत फळे येतात अशा तऱ्हेने प्रत्येक हंगामात 900 क्विंटल पपईचे उत्पन्न मिळू शकते, त्यातून जवळपास 36 लाखांपर्यंतचे उत्पन्न निश्चित आहे. एवढेच नाही तर पपईच्या ऑफ सीझन फार्मिंगमध्ये भाजीपाला आणि कडधान्य पिकांच्या लागवडीतून तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नही मिळणार आहे.