कृषी

Papaya Farming : “या” रोगामुळे पपईची झाडे तुटून पडतात! हे लक्षण दिसल्यास वेळेवर अशा पद्धतीने नियंत्रण मिळवा

Papaya Farming : भारतात फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. पपई (Papaya Crop) हे देखील प्रमुख फळपीक आहे. आपल्या राज्यात बहुतांश भागात पपईची शेती (Papaya Farming) मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

संपूर्ण भारत वर्षाचा विचार केला तर पपई शेती तामिळनाडू, बिहार, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, उत्तरांचल आणि मिझोराम या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. देशातील शेतकरी बांधव (Farmer) पपईच्या सुधारित वाणांची (Papaya Variety) लागवड करून चांगला नफा कमावत आहेत.

पपई फळ पिकातून चांगले उत्पन्न मिळत असते तरीदेखील फळझाडाची पावसाळ्याच्या दिवसात जास्त काळजी घ्यावी लागते. जाणकार लोकांच्या मते पावसाळ्यात स्टेम रॉट रोगामुळे झाड कमकुवत होते आणि पडते. हा रोग बहुतेकदा पावसात कॉलर रॉट रोगामध्ये दिसून येतो. अशा परिस्थितीत, मुळांच्या वरच्या भागांवर सतत लक्ष ठेवणे आणि लक्षणे दिसताच फवारणी करणे चांगले राहणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.

पपईसाठी घातक स्टेम रॉट रोग कसा पसरतो बर?

कृषी तज्ञांच्या मते, पावसाळ्यात जिवाणूंची क्रिया वाढल्याने, पपईच्या झाडाला स्टेम रॉट रोग होण्याची शक्यता असते. या रोगामुळे देठावरील मुळांच्या सालाच्या वरच्या भागावर काळे स्पंजी ठिपके दिसतात. हे डाग हळूहळू मोठे होतात आणि जमिनीच्या अगदी वरच्या स्टेमच्या कॉलरचा भाग पोकळ करतात. मित्रांनो असे सांगितले जाते की हा रोग वेगाने वाढतो आणि मुळांवर काळ्या रंगाच्या मधमाशीचे पोळे बनवतो. त्यामुळे पपईच्या उत्पादनावर परिणाम होतो, अनेक वेळा झाडाला फळेही येत नाहीत आणि झाडे जमिनीवर पडतात. यामुळे या रोगावर नियंत्रण (papaya crop management) मिळवणे अतिशय आवश्यक आहे. आज आपण या रोगावर (papaya pest) कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या रोगावर असे नियंत्रण मिळवता येत बर 

स्टेम रॉट रोग म्हणजेच कॉलर रॉट रोग दिसल्यावर रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून जाळून टाकावीत, जेणेकरून हा रोग इतर झाडांपर्यंत पोहोचणार नाही.

पपई किंवा इतर फळबागांमध्ये नेहमी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, कारण हा रोग पाणी साचल्यामुळे होतो.

पपईच्या झाडावरील फळे आणि पानांचे निरीक्षण करण्यासोबतच मुळांची तपासणी करत रहा, जेणेकरून रोग दिसला की त्यावर वेळीच उपचार करता येतील.

शेतात आधीच पाणी कुज किंवा इतर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर पपईची बाग पुन्हा लावू नये.

या औषधंचा वापर करा

पपई लागवडीदरम्यान अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ तज्ज्ञांशी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांच्या सल्ल्यानुसार फळबागांमध्ये फवारणी व प्रतिबंधात्मक उपाय करता येतील.

जमिनीच्या आजूबाजूच्या देठावर डाग दिसल्यास, तांबे ऑक्सिक्लोराईड बुरशीनाशक प्रादुर्भावग्रस्त भागावर लावल्यास फायदा होतो.

शेतकर्‍याला हवे असल्यास 3 ग्रॅम कॉपर ऑक्‍सी क्लोराईड प्रति लिटर पाण्यात विरघळवून झाडांभोवती व जमिनीवर योग्य प्रमाणात फवारावे.

यानंतर, मेटालॅक्सिल आणि मॅन्कोझेबच्या उपयुक्ततेसह 2 ग्रॅम बुरशीनाशक प्रति लिटर पाण्यात विरघळवून, आपण माती योग्यरित्या ओलवू शकता.

यावर उपाय म्हणून कॅप्टन, मॅन्कोझाब, कॅप्टाफल या बुरशीनाशकांचा वापर करण्याची शिफारसही कृषी तज्ज्ञ करतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts