कृषी

Farming Business Idea: ‘या’ झाडाची लागवड करा आणि 5 वर्षात कमवा लाखो रुपये! वाचा पैसे मिळवण्याचा मार्ग

Farming Business Idea:- शेती आता अनेक दृष्टीने किंवा अनेक अंगांनी आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर होताना दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण विचार केला तर अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीतून भरघोस उत्पादन आणि त्या माध्यमातून भरघोस असे आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे.

परंपरागत शेती पद्धती आणि पिकांना तिलांजली देत वेगवेगळ्या आधुनिक पिकांची लागवड आणि इतर फळबागांची लागवड देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पीक प्रयोग सध्या शेतकरी शेतीमध्ये करतात. तसेच काही झाडांची लागवड करून देखील शेतकरी लाखो रुपये कमावतात.

यामध्ये निलगिरी तसेच साग, बांबू यासारख्या उपयुक्त झाडांची लागवड करून दीर्घकालासाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला जातो. अगदी त्याच पद्धतीने जर आपण मलबार या कडुनिंबाच्या लागवडीबद्दल विचार केला तर या कडुनिंबाच्या झाडांमध्ये देखील तुम्हाला पाच वर्षात लाखो रुपये कमवून देण्याची क्षमता आहे. या अनुषंगाने आपण मलबार कडुलिंबाची शेती याबद्दल माहिती घेणार आहोत.

मलबार कडुलिंबाची लागवड आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत

मलबार कडुलिंबाचे लाकूड हे अनेक कामांकरता वापरले जाते असे म्हटले जाते. त्याचे लाकूड पॅकिंग तसेच माचीसच्या काड्या बनवणे, खुर्च्या व टेबल तसेच सोपा बनवणे आणि इतर कामात देखील त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.

त्याचा बहुअंगी उपयोग पाहता शेतकरी याची शेती करून लाखो रुपये कमवू शकतात. विशेष म्हणजे मलबार कडुलिंबाच्या झाडाचे लाकूड हे बाजारात खूप महागड्या दराने विकले जाते. मलबार कडुलिंबाचे झाड हे सामान्य कडुलिंबाच्या झाडापेक्षा थोडी वेगळे असते. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये याची सहजपणे लागवड करू शकतात व महत्त्वाचे म्हणजे याला जास्त पाण्याची देखील आवश्यकता नसते.

कमीत कमी पाण्यामध्ये देखील याची चांगली वाढ होते. साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिन्यात याची लागवड करणे चांगले मानले जाते. तसेच तुम्हाला चार एकर मध्ये जर मलबार कडुनिंबाची लागवड करायची असेल तर साधारणपणे 5000 झाडे यामध्ये मावतात.

याशिवाय तुम्ही चार एकरच्या आता बाहेरील बांधावर देखील याची झाडे लावू शकतात. याचा वाढीचा विचार केला तर लागवडीनंतर दोन वर्षांमध्ये हे 40 फूट उंच वाढते. भारतातील केरळ तसेच आंध्र प्रदेश व तामिळनाडू, कर्नाटक राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या मलबार कडुलिंबाच्या झाडाची लागवड करतात.

याची लागवड केल्यानंतर पाच वर्षांमध्ये लाकूड वापरायोग्य बनते. एका वर्षामध्ये या मलबार कडुलिंबाच्या रोपाची आठ फूट उंचीपर्यंत वाढ होते. मलबार कडुलिंबाची लाकूड हे प्लायवूड उद्योगाकरिता सर्वात जास्त वापरले जाते.

साधारणपणे पाच वर्षानंतर प्लायवूड बनवण्याकरिता आणि आठ वर्षानंतर ते फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते. मलबार कडुलिंबाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे जसे जसे या झाडाचे वय वाढत जाते तसे तसे त्याच्या उत्पन्नात देखील वाढ होते.

किती मिळू शकते कमाई?

साधारणपणे आठ वर्षांनी तुम्ही मलबार कडुलिंबाच्या लाकडाची विक्री करू शकतात. चार एकरात लागवड केली तर तुम्ही 50 लाखाची कमाई सहजपणे करू शकतात. त्याच्या एका झाडाचे वजन दीड ते दोन टन असते. जर आपण याच्या लाकडाची किंमत पाहिली तर किमान पाचशे रुपये प्रति क्विंटल दराने त्याची विक्री होते. अशा परिस्थितीमध्ये एक रोप सहा ते सात हजार रुपयांना विकले तरी शेतकऱ्यांना लाखो रुपये सहज मिळतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts