कृषी

PM Kisan 15th Installment : पीएम किसानच्या 15 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचाय? आजच करा ‘हे’ काम, नाहीतर अडकतील पैसे

PM Kisan 15th Installment : शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सरकार त्यांच्या फायद्यासाठी अनेक योजना राबवत असते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचे पैसे आले आहेत. लवकरच त्यांना 15 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. परंतु सरकारने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. प्रत्येक वर्षी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये देण्यात येतात. दर 4 महिन्यांनी एक हप्ता जारी करतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एका चुकीमुळे 14 व्या हप्त्याचे पैसे आले नाहीत. जर तुम्हाला आता 15 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाची कामे 15 व्या हप्त्यापूर्वी उरकून घ्या. नाहीतर तुम्हालाही या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

इतके शेतकरी राहणार 15 व्या हप्त्यापासून वंचित

कृषी विभागाचे सर्व प्रयत्न करूनही अनेक शेतकऱ्यांचे ईकेवायसी पूर्ण होत नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अजूनही राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांनी eKYC पडताळणी पूर्ण केलेली नाही. तर त्याच वेळी, सहा लाख शेतकऱ्यांनी EKYC केले आहे.

मात्र त्यांची बँक खाती आधारशी लिंक करण्यात आली नाहीत. त्यामुळे असे शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 15 व्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्हीही अजून eKYC पडताळणी पूर्ण केली नसेल तर आजच पूर्ण करून घ्या. नाहीतर तुम्हालाही 15 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल.

तसेच शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्यावी. शेतकऱ्यांचे बँक खाते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी जोडलेले असावे. समजा तुमचे खाते लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणे कठीण अवघड होईल. त्यामुळे जर तुम्हाला १५ व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून घ्या.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts