कृषी

Pm Kisan: पीएम किसानचे 2 हजार आले नाहीत का? अहो मग डोन्ट वरी! करा ‘हे’ एक काम लगेच येतील पैसे

Pm Kisan Sanman Nidhi Yojana: पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची (Central Government) एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून योजनेच्या पात्र शेतकर्‍यांना 6 हजार रुपये वार्षिक 2 हजाराच्या एकूण तीन हफ्त्यात दिले जातात.

आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून अकरा हप्ते पात्र शेतकऱ्यांना (Farmer) देण्यात आले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 22 हजार रुपये प्रत्येकी आतापर्यंत मिळाले आहेत.

पीएम किसानच्या एप्रिल-जुलै 2022 चा 2 हजार रुपयांचा 11वा हप्ता खरं पाहिल तर 10 कोटी 60 लाख 86 हजार 163 शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणे सुरू झाले आहे.

यापैकी कोट्यवधी शेतकरी बांधवांना 11 वा हप्ताही मिळू लागला आहे, मात्र अद्यापही सुमारे 2 कोटी शेतकरी या हप्त्यापासून वंचित असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे.

कारण, या योजनेबद्दल बोलायचे झाल्यास 12.54 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. जर तुम्ही या योजनेचे पात्र शेतकरी असाल आणि तुमचा हप्ता हँग झाला असेल किंवा हफ्त्याचे पैसे आले नसतील तर तुमचे 2 हजाराचे नुकसान होऊ शकते शिवाय या योजनेपासून वंचित देखील तुम्ही होऊ शकता.

मित्रांनो तज्ञाच्या मते हप्त्याला विलंब होण्याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, eKYC पूर्ण न केल्यास, आधार आणि बँक खात्यावरील नावाचे स्पेलिंग जुळत नसल्यास.

खाते क्रमांक बरोबर नसल्यास, ऑनलाइन अर्ज मंजुरीसाठी हँग झाला असल्यास, व्यवहार अयशस्वी झाल्यास, आधार दुरुस्तीमध्ये समस्या असल्यास, लिंग योग्यरित्या प्रविष्ट केले नसल्यास, पेमेंटशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, OTP घेतल्यानंतर एखादी समस्या उद्भवली असल्यास, EKYC किंवा बायोमेट्रिक आधारित EKYC केली नसल्यास हप्ता उशिरा येतो किंवा येत नाही.

जर तुमचाही असा प्रॉब्लेम असेल तर चिंता करू नका आज आम्ही तुमच्यासाठी यावर उपाय घेऊन हजर झालो आहोत.जर तुमचा असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या समस्या PM किसान पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्या सोडवू शकता.

यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. या सर्व समस्यांचा लाभ घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरून घेता येतो.

यासाठी सर्वप्रथम तुम्हाला PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल आणि उजव्या बाजूला फार्मर कॉर्नरवर जावे लागेल आणि तळाशी असलेल्या हेल्प डेस्कवर क्लिक किंवा टॅप करावे लागेल.

त्यांनतर एक पेज तुमच्या समोर येईल.जर तुमच्या हफ्त्याबाबत काही समस्या असतील तर तुम्हाला रजिस्टर क्वेरी तपासावी लागेल. यानंतर, तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक प्रविष्ट करणे आणि Get Details वर क्लिक करणे महत्वाचे आहे.

यानंतर, अजून एक पेज तुमच्या समोर येईल. तक्रार प्रकारात, खाते क्रमांक बरोबर नसल्यास, ऑनलाइन अर्ज मंजुरीसाठी थांबणे, हप्ता मिळाला नाही, व्यवहार अयशस्वी, आधार दुरुस्तीमध्ये समस्या, लिंग योग्यरित्या प्रविष्ट केलेले नाही, पेमेंट संबंधित कोणतीही समस्या असल्यास किंवा इतर समस्या, ओटीपी आधारित ईकेवायसी किंवा बायोमेट्रिक ईकेवायसी, हे पर्याय दिसतील त्यापैकी एक तुम्हाला निवडावा लागेल.

यानंतर तुमची तक्रार किंवा समस्या खालील बॉक्समध्ये लिहून इमेज कोड टाकल्यानंतर सबमिट करणे महत्त्वाचे आहे. याचा मागोवा घेण्यासाठी, तिसर्‍या पायरीवर जाऊन क्‍वेरी स्टेटस जाणून घ्या.

यानंतर, क्वेरी आयडी किंवा आधार क्रमांक, किंवा खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या तक्रारीची स्थिती तपासावी लागेल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts