Pm Kisan Rule:- शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंब करण्यासाठी आणि शेतीचा विकास व्हावा याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करता यावी याकरिता शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनांचा फायदा होतो.
या सगळ्या योजनांच्यामध्ये जर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विचार केला तर ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून सर्वात यशस्वी योजनेंपैकी एक आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात.
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बऱ्याच अपात्र शेतकऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेच्या नियमांमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात आले. जसे की ई केवायसी हे अत्यावश्यक करण्यात आली तसेच आधार नंबर लिंक करणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या करण्यात आल्या.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या मनामध्ये या योजनेविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात व त्यातीलच एका प्रश्नाचा विचार केला तर बऱ्याच जणांच्या मनात येत असेल की या योजनेचा लाभ वडील आणि मुलगा दोघांना मिळू शकतो का? याच प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात बघू.
वडिलांनी मुलगा दोघांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो का?
15 नोव्हेंबर 2023 रोजी पीएम किसान चा 15 वा हफ्ता जारी करण्यात आलेला होता व या माध्यमातून आठ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. आतापर्यंत 15 हप्त्यांच्या रूपामध्ये शेतकऱ्यांना 2.81 लाख कोटी रुपये वितरित करण्यात आलेले असून आता शेतकऱ्यांना या योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
परंतु एकाच घरात वडील आणि मुलगा दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर त्याचे उत्तर नाही असे आहे. जर आपण या योजनेचे नियम पाहिले तर एका कुटुंबातील एका सदस्यालाच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असतो.
नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून अलीकडच्या या योजनेच्या नियमाबाबत एक नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे. या नोटीस नुसार पाहिले तर देशातील अनेक लोक पात्र नसताना देखील पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. कुटुंबातील फक्त एक सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो. कारण पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित लाभार्थ्याच्या नावावर शेती योग्य जमीन असणे गरजेचे आहे. तरच या योजनेचा फायदा आपल्याला मिळत असतो.
या योजनेविषयी कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर इथे करा संपर्क
या योजनेच्या संदर्भात काही तक्रार असेल तर तुम्ही पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800-011-5526( टोल फ्री) किंवा 011-23381092 जारी करण्यात आलेला आहे. या माध्यमातून शेतकरी संपर्क साधू शकतात.