कृषी

PM Kisan : तर… फक्त या शेतकऱ्यांनाच मिळणार पीएम किसानचा 14 वा हप्ता; पहा यादीत तुमचे नाव असेल का…

PM Kisan : जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि आता 14 वा हप्ता येण्याची वाट पाहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता या योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत 13 हप्ते शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आता शेतकरी चौदाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेशी जवळपास 9 कोटी शेतकरी जोडले गेले आहेत. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 2-2 हजार रुपये मिळतात.

दरवर्षी 6 हजार रुपये मिळवा

या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देते. याशिवाय या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड सरकारकडून आवश्यक करण्यात येत आहे.

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हाही यामागचा उद्देश आहे. 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. परंतु आतापासून तुम्हाला पुढील हप्ता मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने चेक करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही तपासू शकता..

– सर्वप्रथम, तुम्ही PM किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत पोर्टलवर जा.
– यानंतर, ‘बेनिफिशियरी स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करा.
– येथे तुमचा नोंदणी क्रमांक किंवा योजनेशी जोडलेला 10 अंकी मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.
– यानंतर, स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाका आणि सबमिट वर क्लिक करा.

– यानंतर तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर स्टेटस दिसेल. पैसे येतील की नाही हे या स्टेटसवरून कळू शकते.
– यानंतर, ई-केवायसी, पात्रता आणि लैंड सीड‍िंग यांच्या पुढे तुम्हाला कोणता संदेश लिहिलेला दिसतो ते पहा.
– या तिघांपैकी कोणाच्याही समोर ‘नो’ लिहिल्यास हप्त्यापासून वंचित राहू शकता.
– तिघांच्या पुढे ‘yes’ लिहिल्यास हप्त्याचा लाभ मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts