Pm Kisan Update:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची आतापर्यंतच्या सगळ्या योजनांमधील यशस्वी आणि महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांना देण्यात येते.
आतापर्यंत या योजनेचे पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले असून यातील पंधरावा हप्ता हा 15 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. परंतु या योजनेच्या संदर्भात शासनाने अनेक प्रकारच्या नियमात बदल केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीमध्ये आहे
परंतु तरी देखील त्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणारा आर्थिक लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. बरेच शेतकरी यासंबंधी प्रयत्न करून थकले परंतु तरीदेखील खात्यात दोन हजाराचा लाभ मिळताना दिसून येत नाही. याच अनुषंगाने या लेखांमध्ये आपण दोन हजाराचा लाभ मिळवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे? यासंबंधीची माहिती घेणार आहोत.
खात्यात दोन हजार रुपये जमा न होण्याची ही असू शकतात कारणे
यामध्ये प्रामुख्याने जर कारणांचा शोध घेतला तर तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नसेल हे देखील कारण असू शकते किंवा ई केवायसी केलेली नसल्यामुळे देखील लाभ मिळाला नसेल. परंतु तुम्ही जर ही सर्व कामे पूर्ण केलेली असतील आणि तरी देखील तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर तुम्ही या संबंधीची तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला लवकरच या योजनेचे पैसे मिळू शकतात.
ग्रामपंचायत मध्ये तुम्ही तक्रार रजिस्टर मध्ये नोंद करू शकतात
पात्र लाभार्थी यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव आहे व तरी देखील या योजनेचा पैसा मिळाला नाही तर बँक किंवा इतर कोणतीही तक्रार असल्यास तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तक्रार रजिस्टर मध्ये नोंद करू शकतात व तुम्हाला यासोबत 8 अ उतारा, सातबारा उतारा तसेच बँकेचे पासबुक, आधार कार्ड तसेच रेशन कार्ड व पीएम किसान योजनेचा ऑनलाईन रिपोर्ट स्टेटस इत्यादी कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.
यामुळे देखील तुमचे पैसे अडकू शकतात
तुम्ही या संबंधी अर्ज भरताना थोडीशी जरी चूक केलेली असेल तरी देखील तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळू शकत नाही. समजा तुमच्या खात्यामध्ये देखील पीएम किसान योजनेचा हप्ता आला नसेल तर त्याआधी तुमच्या अर्जाची स्टेटस तपासणे गरजेचे आहे.
समजा यामध्ये तुम्ही काही चुकीची माहिती दिली असेल जसे की नावामध्ये चूक, चुकीचा आधार क्रमांक देणे किंवा पत्ता चुकीचा देणे इत्यादी कारणांमुळे देखील तुम्हाला हप्ता मिळू शकत नाहीत. तुमच्या अर्जाची स्थिती तपासल्यानंतर जर तुम्हाला अशा काही चुका दिसून आल्या तर त्यामध्ये तुम्ही त्वरित दुरुस्ती करणे गरजेचे आहे. जर तुम्ही हे काम केले तर पुढील हप्त्यासह तुमची रक्कम तुमच्या खात्यात पाठवली जाण्याची शक्यता वाढते.
या ठिकाणी संपर्क साधणे आहे गरजेचे
सर्व काही बरोबर आहे तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल किंवा रक्कम तुमच्या खात्यात आली नसेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही pmkisan-ict@gov.in या अधिकृत ईमेल आयडीवर मेल द्वारे संपर्क साधू शकता. तसेच या व्यतिरिक्त तुम्ही पीएम किसान योजनेचे हेल्पलाइन क्रमांक जसे की 155261,1800-1155-26( टोल फ्री) किंवा 011-23381092 या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही तुमची समस्या दूर करू शकतात.