Pomegranate Rate: डाळिंबाच्या दरात मोठी घसरण; डाळिंब उत्पादक चिंतेत

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Pomegranate Production :- भारतात डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन (Pomegranate Production) घेतले जाते. भारत जगातील एकूण डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत शीर्षस्‍थानी विराजमान आहे.

देशाच्या एकूण डाळिंब लागवड आणि डाळिंबाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डाळिंब शेती (Pomegranate Farming) केली जाते. येथील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण डाळिंब पिकावर (Pomegranate Crop) अवलंबून असते.

पुणे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी (Pomegranate Producer) सध्या हस्त बहारातील डाळींब काढणी करीत आहेत. मात्र, सध्या डाळिंबाला अतिशय कवडीमोल दर (Pomegranate Rate) मिळत असल्याने जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.

परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की या भागात डाळिंब खरेदी करण्यासाठी व्यापारी देखील फिरकत नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. हस्त बहार मधील डाळिंब बागांना डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी लाखोंचा खर्च केला आहे. मध्यंतरी हवामान बदलामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागली होती.

डाळिंबासाठी खत, महागडे औषध फवारणी, छाटणी पासून ते काढणीपर्यंत लागलेली मजुरी, वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता डाळिंबासाठी आच्छादन यासाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.

यामुळे सध्या मिळत असलेल्या दरात डाळिंबासाठी आलेला उत्पादन खर्च निघेल की नाही याबाबत देखील शेतकऱ्यांना शाश्वती नाही.

आधीच बदलत्या हवामानामुळे मर रोग,पिन होल बोरर,तेल्या, या रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी केदार झाला असून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंबाची बाग उपटली आहे. याव्यतिरिक्त चालू हंगामात काळी टिक डाळिंब बाकावर मोठ्या प्रमाणात असल्याने नेहमीपेक्षा अधिक उत्पादन खर्च करावा लागला आहे.

यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. खरं पाहता एप्रिल महिन्यात डाळिंबाला समाधानकारक बाजार भाव असतो मात्र, डाळिंब खरेदी करणारे व्यापारी रशिया आणि युक्रेन युद्धाचा हवाला देत कमी भावात डाळिंबाची खरेदी करीत आहेत.

व्यापाऱ्यांच्या मते, युद्धामुळे डाळिंब निर्यातीसाठी अडचणी येत असल्याने डाळिंबाचे दर पडले आहेत. निर्यात करणारे व्यापारी नेहमीसारखे जिल्ह्यात डाळिंब खरेदी करताना बघायला मिळत नाहीयेत. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत आहे.

बाजारपेठेत आवक कमी असून देखील डाळिंबाला खुपच कमी बाजारभाव मिळत आहे यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून अनेक बागायतदार आता डाळिंब बागा उपटून फेकण्याच्या विचारात आहेत. एकंदरीत उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग आता फसत आहे.p

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe