कृषी

Agri Machinery: एक पावर विडर करेल शेतातील अनेक कामे! एकदा ‘या’ यंत्राच्या खरेदीसाठी कराल पैसा खर्च परंतु होईल वर्षानुवर्षे पैशांची बचत

Agri Machinery:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाल्यामुळे शेतीतील प्रत्येक कामासाठी आता वेगवेगळ्या प्रकारच्या अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी यंत्रे विकसित करण्यात आलेली आहेत व यामध्ये देशातील अनेक कृषी विद्यापीठे व कृषी संशोधन केंद्रांचा मोलाचा हातभार आहे. शेतीमधील जर आपण आंतरमशागतींच्या किंवा इतर कामांचा विचार केला तर यासाठी मजुरांची आवश्यकता बऱ्याच कामांसाठी मोठ्या प्रमाणावर भासते व यामुळे साहजिकच उत्पादन खर्च वाढतोच परंतु काम व्हायला देखील खूप वेळ लागतो.

परंतु आता अनेक आंतरमशागतीच्या कामांसाठी जसे की तणांचे नियंत्रण, पिकांना मातीची भर लावणे यासारख्या अनेक कामांकरिता आता यंत्र विकसित झाल्याने अगदी एकटा व्यक्ती देखील या यंत्रांच्या साह्याने शेतात काम करून कमी वेळेत जास्त काम करू शकतो व मजुरांवरचा खर्च वाचवू शकतो. त्यामुळे अशी यंत्रे ही शेतकऱ्यांसाठी खरंच एक वरदान ठरताना आपल्याला दिसून येत आहेत.

पिकांमधील गवताचे म्हणजेच तनांचे नियंत्रण करणे हे एक खूप खर्चिक काम असून मजुरांची आवश्यकता देखील जास्त प्रमाणात लागतात. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर पावर विडर शेतकऱ्यांनी वापरले तर ते शेतकऱ्यांना अधिक फायद्याचे व आर्थिकदृष्ट्या परवडणारे ठरते.

या पावर विडर वर तुम्ही लहान आकाराचा फळाचा नांगर, सरी रिझर,सीड ड्रिल, कल्टीवेटर तसेच बटाटा खोदण्याचे यंत्र, कापणी यंत्र, एचटीपी फवारणी यंत्र, वॉटर पंप तसेच अल्टरनेटर, थ्रेशर सारखे अनेक छोटी उपकरणे जोडून ती वापरू शकतात. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ट्रॅक्टर काम करू शकत नाही अशा अवघड ठिकाणी पावर विडर अनेक मशागतीची कामे करू शकते.

 काय आहेत पावर विडर या यंत्राची वैशिष्ट्ये?

1- याचा देखभाल खर्च खूप कमी असतो.

2- पुरुष किंवा स्त्री असा दोघांपैकी एक व्यक्ती देखील या यंत्राला सहजपणे चालवू शकते.

3- महत्वाचे म्हणजे पावर विडर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला राज्य व विभागानुसार सरकारी अनुदान देखील उपलब्ध आहे.

4- यंत्राचा वापर पिकांमधील तन काढण्यासाठी तसेच खतांचे मातीत मिश्रण करण्यासाठी आणि माती मळण्यासाठी व महत्त्वाचे म्हणजे जेव्हा पिकाची वाढ व्हायला लागते तेव्हा माती सैल करण्यासाठी देखील त्याचा वापर होतो.

5- साधारणपणे या पावर विडरची शक्ती एक एचपी ते आठ एचपी पर्यंत असते.

6- या यंत्राचे तीन प्रकार आहेत व त्यातील पहिला म्हणजे सेंटर रोटरी, दुसरा म्हणजे फ्रंट रोटरी आणि तिसरा म्हणजे बॅक रोटरी हे होय.

7- पावर विडरचा वापर तुम्ही ऊस, आले तसेच हळद पिकामध्ये मातीची भर लावण्यासाठी करू शकतात.

8- कमी अंतराच्या वाहतुकीसाठी उपयोगी

9- विशेष म्हणजे व्यक्तीला त्याच्या उंचीनुसार या यंत्राच्या हँडलच्या उंचीचे ऍडजेस्टमेंट करता येते.

 इतर कुठली कामे करता येतात?

1- तुम्हाला पेरणीपूर्वी मशागत करायची असेल तर या यंत्राच्या साह्याने तुम्ही करू शकतात.

2- पिकांमधील तन काढणे आणि वाढणाऱ्या पिकांमधील महत्त्वाची आंतरमशागत करण्यासाठी हे उपयोगी आहे.

3- एवढेच नाही तर तुम्हाला पिकांवर रासायनिक खतांची फवारणी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकतात.

4- पावर विडरला तुम्ही इतर अवजारे जोडून शेतीची विविध कामे पूर्ण करू शकतात. त्यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही लागवडी अगोदरची पूर्व मशागत तसेच पिकांची पेरणी, पिकांमधील निंदनी, पिकांमधील फवारणी तसेच जलसिंचन व कापणी देखील करू शकतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts