शेती व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये यांत्रिकीकरण या बाबींना शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवून प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेती व्यवसायामध्ये अनेक घटकांकरिता अनुदानाचा लाभ अनेक योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असून त्याचपद्धतीने शेती कामासाठी आवश्यक यंत्र खरेदीवर शासनाच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेले आहेत व आर्थिक लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
तसेच अनेक महामंडळाच्या माध्यमातून देखील शेती व्यवसायाच नाहीतर समाजातील काही घटकाकरीता देखील महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. अगदी याच अनुषंगाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबवण्यात येत असून या माध्यमातून आतापर्यंत राज्यात 17000 लाभार्थ्यांना 5140 कोटी रुपयांचे कर्ज देखील व्यवसायांच्या उभारण्याकरिता वितरित करण्यात आलेले आहे
व त्यापैकी 58 हजार पेक्षा अधिक लाभार्थ्यांना 567 कोटींचा व्याज परतावा देखील महामंडळाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. अगदी याच पद्धतीने आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना देखील सुरू करण्यात येणार आहे व त्याबाबतची अपडेट आपण पाहणार आहोत.
दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी व्याज सवलत योजना सुरू
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत असून शेतीसाठी उपयुक्त असलेल्या ट्रॅक्टर सारख्या यंत्राच्या खरेदीवर व्याज सवलत योजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे व याची सुरुवात दसऱ्यापासून होणार आहे.
याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. मंत्रालयाच्या विधिमंडळ वार्ताहर कक्षामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या योजना संदर्भात माहिती दिली. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेच्या माध्यमातून स्थगित असलेली जी काही ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे होती ती आता पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत असून दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात होणार आहे.
annasaheb एवढेच नाही तर याकरिता महिंद्रा आणि एस्कॉर्ट टर्बो या दोन कंपन्यांसोबत सामंजस्य करार देखील करण्यात येणार. तसेच या महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व त्यासोबतच शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना देखील प्रस्तावित करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.यामध्ये ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे पुन्हा सुरू करण्यात येणार असून याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत.
लाभार्थ्यांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून काही योजनांमध्ये महामंडळाने केले बदल
1- काही योजनांमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले असून त्यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत कर्ज मर्यादा ही 10 लाख रुपयांवरून पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
2- तीन लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा ही साडेचार लाख रुपयांपर्यंत वाढवून आता या कर्जाचा कालावधी पाच वर्षांऐवजी आता सात वर्ष करण्यात आला आहे.
3- तसेच महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून आता सर्वांकरिता वयोमर्यादा ही साठ वर्षांपर्यंत करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर महामंडळाच्या माध्यमातून महामंडळ आपल्या दारी ही कार्यवाही सुरू करण्यात आली असून या माध्यमातून 11 जिल्ह्यांमध्ये दौऱ्यांच्या आयोजन करण्यात आलेले आहे व लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून बँक ऑफ इंडिया समवेत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. एवढेच नाही तर लाभार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता राज्यातील सर्व सीएससी सेंटर सोबत देखील महामंडळाच्या माध्यमातून सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.