कृषी

Rice Farming: शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊसच पडणार…! फक्त भातशेती बरोबर करा हे एक काम, लाखोंची कमाई होणारं फिक्स

Rice Farming: मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील अर्थव्यवस्था ही शेतीवर (Farming) अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाकडे (Farmer Income) सर्वांचे लक्ष लागून असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी (Farmer) करावा म्हणून शासनस्तरावरून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे.

शिवाय कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देत आहेत. भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) सूरू आहे. देशात जवळपास सर्वत्र मान्सूनने दस्तक दिली असल्याने खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी बांधव लगबग करत आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील पेरणीची कामे करीत आहेत. त्यांना खरे पाहता खरीप हंगामात आपल्या राज्यात तसेच संपूर्ण देशात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.

भात हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून एक नगदी पीक (Cash Crop) म्हणून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात याची शेती करत असतात. भात शेती शेतकर्‍यांच्या चांगल्या उत्पन्नाचे साधन आहे, त्यामुळे पावसाळ्यात भातशेती करण्याकडे कल आहे.  सध्या राज्यातील कोकण विभागात भात रोवणीची कामे प्रगतीपथावर आहेत.

भातशेतीतून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात खत-खाद्य वापरतात आणि नवनवीन तंत्रे वापरतात. मित्रांनो जर आपणही भात रोवणी करत असाल तर आपण भातशेतीबरोबरच मत्स्यशेती करूनही अधिक नफा मिळवू शकता. या खास तंत्राला फिश-राइस फार्मिंग (Fish-Rice Farming) असं म्हणतात, म्हणजे भातासह मत्स्यशेतीची कृती, जे एकात्मिक शेतीचे मॉडेल आहे.

मत्स्य-भात शेतीचे फायदे काय आहेत

अतिसिंचन आणि पावसामुळे भात पिकात पाणी तुंबते, जी पिकाची गरज असते, परंतु काही वेळा हे अतिरिक्त पाणी शेतातून बाहेर काढावे लागते, त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. अशा परिस्थितीत भातशेतीतच माशाचे संगोपन करून पाण्याचा योग्य वापर करून भाताबरोबरच मासे विकून दुप्पट पैसे कमावता येतात.

मत्स्य-भात शेती करणारे देश

अहवालानुसार, मत्स्य-भात शेती हे नवीन तंत्रज्ञान नाही, कारण की बहुतेक देश या तंत्रज्ञानाद्वारे आधीच मोठा नफा कमावत आहेत, ज्यामध्ये चीन, बांगलादेश, मलेशिया, कोरिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड इ. देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये अशी इंटिग्रेटेड शेती करणे आता फायदेशीर व्यवहार होत आहे, त्यामुळे भारतातील बहुतांश भागात शेतकऱ्यांना या तंत्राचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts