Rice Farming: सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरु आहे. देशात जवळपास आता सर्वत्र मोसमी पावसाची (Rain) हजेरी लागली आहे. यामुळे देशात सर्वत्र खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची (Farmer) लगबग वाढली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील आता खरीपातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मित्रांनो खरीप हंगामातील पिकातून चांगल्या उत्पादनासाठी चांगला पाऊस किंवा जास्त सिंचन आवश्यक असते. शेतकऱ्यांच्या मते, दोन पिकांना जेवढ पाणी आवश्यक असतं तेवढं पाणी केवळ भातशेतीला (Paddy Farming) लागते. ज्यामुळे कमी पाऊस असलेल्या भागात भातशेती करणे आव्हानात्मक बनले आहे.
कृषी शास्त्रज्ञही आता अनेक राज्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा जास्त वापर पाहता भातशेती न करण्याचा सल्ला देत आहेत. मित्रांनी भात हे खरीप हंगामात लावले जाणारे एक मुख्य पीक आहे. याची भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्या राज्यात देखील भात शेती (Farming) विशेष उल्लेखनीय आहे.
मात्र, असे जरी असले तरी देखील भातशेतीला अधिक पाणी लागत असल्याने शेतकरी बांधवांना भात शेती यशस्वी करून दाखवण्यात मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, कृषी विज्ञान केंद्र, जमुई आणि भारतीय कृषी संशोधन संस्था, पाटणा यांच्या शास्त्रज्ञांनी मिळून पाण्याच्या कमतरतेमध्ये उच्च उत्पादन देणारी स्वर्ण शक्ती या जातीचा (Rice Variety) शोध लावला आहे.
यामुळे आता भात शेती आधी पेक्षा कमी पाण्यात यशस्वी होणार असल्याचा दावा केला जात आहे. निश्चितच सुवर्ण शक्ती ही भाताची जात (Paddy Variety) भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. मित्रांनो जाणून घेऊया सुवर्ण शक्ती या जातीविषयी सविस्तर.
स्वर्णशक्ती या भाताच्या जातीची विशेषता
•कमी पाणी, कोरडवाहू क्षेत्र किंवा कमी पाऊस अशा ठिकाणी स्वर्णशक्ती भात पिकवल्यास इतर जातींपेक्षा जास्त उत्पादन मिळते.
•अहवालानुसार, अचानक दुष्काळ पडला तरी धानाच्या या जातीवर फारसा परिणाम होत नाही.
•गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीतही ही जात 15 दिवस तग धरून राहते.
•स्वर्णशक्ती भात लागवड केल्यास कमी खर्चात व कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळते.
•ही मध्यम कालावधीची जात आहे जी 115-120 दिवसात परिपक्व होते. स्वर्ण शक्ती धानापासून एक हेक्टर शेतातून 45-50 क्विंटल पर्यंत निरोगी उत्पादन मिळू शकते.
अशी करा लागवड
•स्वर्ण शक्ती भात पेरणीसाठी जून-जुलै हा सर्वोत्तम काळ आहे.
•या दरम्यान बियाणे ड्रिल पद्धतीने पेरणीसाठी हेक्टरी 25-30 किलो बियाणे वापरावे.
•बियाणे शेतात पेरण्यापूर्वी त्यांना थिरम आणि कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी.
•पिकाच्या चांगल्या वाढीसाठी शेतात 120 कि.ग्रॅ. नायट्रोजन, 60 किलो फॉस्फरस आणि 40 किग्रॅ. पोटॅश शेणात मिसळून शेतात टाकावे.
•त्याच्या पेरणीसाठी शेतात पाणी साचण्याची, चिखलाची किंवा रोपवाटिका तयार करण्याची गरज नाही.
•सीड ड्रिलच्या साहाय्याने कमी ओलावा असलेल्या शेतात 3-5 सें.मी. खोली आणि 20 सें.मी. अंतरावर पेरणी केली जाते.
•अवर्षणप्रवण भागातही त्याच्या लागवडीसाठी फक्त हलका ओलावा आवश्यक आहे.
•स्वर्ण शक्ती भात पेरणीनंतर शेतात तणांचा प्रादुर्भाव वाढतो. या समस्येसाठी शेतात खुरपणी आणि निंदणी करत रहा, ज्यामुळे पीक वाढण्यास मदत होईल.