पिकांच्या भरघोस उत्पादन मिळण्याकरिता अनेक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असते. पिकांची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत पिकांची आंतरमशागत हे खूप महत्त्वाचे असते. आपल्याला माहित आहेस की आंतरमशागतीमध्ये निंदणी तसेच कोळपणी यासारख्या कामांना खूप महत्त्व असते. परंतु जर आपण निंदनीचा विचार केला तर तणांचा प्रादुर्भाव किंवा तन नियंत्रणाकरिता मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते.
आधीच मजुरांची टंचाई असल्याकारणाने बऱ्याचदा शेतकऱ्यांची याबाबतीत होरपळ होते. तसेच मजुरीचा खर्च देखील प्रचंड प्रमाणात वाढतो. या पार्श्वभूमीवर जर आपण कृषी यांत्रिकीकरणाचा विचार केला तर आता कृषी क्षेत्रामध्ये देखील अनेक कामांसाठी यंत्र विकसित झाले असून या यंत्रांच्या मदतीने आता शेतीची अनेक कामे कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात करता येणे शेतकऱ्यांना शक्य झालेले आहे.
मजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे ही आता काळाची गरज आहे. याच पद्धतीने पिकांमधील तणांचे नियंत्रण करता यावे याकरिता तन काढण्याकरिता शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल आणि त्यांच्या खर्चात बचत होईल असे एक नवीन यंत्र विकसित करण्यात आलेले आहे व या यंत्राचे नाव आहे सानेडो हे होय.
सानेडो मशीन करेल शेतकऱ्यांना तण काढण्यासाठी मदत
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नुकतेच शेतकऱ्यांना तण नियंत्रणाकरिता उपयोगी पडेल असेल सानेडो हे नवीन यंत्र विकसित करण्यात आलेले असून ते शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. ट्रॅक्टर प्रमाणे काम करणारे हे मशीन पिकातील तण काढण्यासाठी वापरले जाते.
जर आपण सानेडो या यंत्राचे रचना पाहिली तर यामध्ये हायड्रोलिक सिस्टम सह पाच फॉल कल्टीवेटर देण्यात आलेले आहेत. या फॉल कल्टीवेटर च्या मदतीने तण काढणीचे काम व्यवस्थितपणे केले जाते व मोकळी झालेली माती बेडवर व्यवस्थित टाकली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना या यंत्राचा खूप मोठा फायदा होणार असून कमी वेळात आणि कमी खर्चात अनेक प्रकारचे कामे करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.
महाराष्ट्रामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असून अशा शेतकऱ्यांकरिता हे मशीन खूप फायदेशीर ठरणार आहे. दहा हॉर्स पावर इंजिन क्षमता असलेले हे यंत्र प्रति तास फक्त आठशे मिली डिझेल वापरते. टिटीसी ने हे मशीन प्रमाणीत केले असून अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आणि परीक्षणाच्या माध्यमातून हे यंत्र विकसित करण्यात आलेले आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून हे परवडण्यासारखे मशीन असून यामध्ये डिझेलचा वापर केला जातो. शेतकऱ्यांची कामे वेळेत पूर्ण करता येण्यासाठी या मशीनचा उपयोग होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढण्यास देखील मदत होण्याची शक्यता आहे.
किती आहे सानेडो मशीनची किंमत?
अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता हे मशीन अतिशय फायदेशीर असून त्यांना परवडण्याजोगे असे आहे. सानेडो मशीन ची किंमत एक लाख 25 हजार रुपये असून ते डिझेल वर चालते.