कृषी

पिकातील तणांची कटकट मिटणार! लहान शेतकऱ्यांना होईल फायदा, वाचा कसे….

यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये कृषी क्षेत्र देखील अपवाद नसून शेतीची पूर्व मशागत, विविध प्रकारच्या पिकांची लागवड ते लागवडीनंतर आंतरमशागत आणि पिकांच्या काढणीकरिता अनेक प्रकारची यंत्र विकसित करण्यात आलेली आहेत. जर आपण शेतीमधील कामाचा विचार केला तर यामध्ये पिकांचे अंतर मशागतीला खूप मोठे महत्त्व असते आणि सगळ्यात जास्त मजुरांचा खर्च हा आंतरमशागतीवरच होत असतो. यामध्ये पिकांतील तणांचा बंदोबस्त हा पीक उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो.

पिकातील तणांच्या

नियंत्रणा करिता निंदणी करणे महत्त्वाचे असते. परंतु निंदनीकरिता मजूर खूप मोठ्या प्रमाणावर लागतात आणि मजुरांची टंचाई आणि मजुरीचे दर पाहिले तर शेतकऱ्यांना हे परवडणारे नाही. तसेच यामध्ये वेळ देखील भरपूर वाया जातो. या दृष्टिकोनातून जर तन नियंत्रणाकरिता एखादे यंत्र राहिले तर किती छान होईल? अगदी याच पद्धतीने आता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी देखील फायद्याचे ठरेल असे तन काढणी यंत्र विकसित करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता निंदनीवरचा खर्च आणि वेळ देखील वाचणार आहे.

 तणनियंत्रणाकरिता सनेडो यंत्र विकसित

पिकांमधील तण नियंत्रणाची कायमच शेतकऱ्यांना चिंता असते. वेळेवर मजूर मिळत नाही आणि त्यातच मजुरीचा दरदेखील प्रचंड असल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडत नाही. त्यातल्या त्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागते. तणनियंत्रण केले नाही तर उत्पादनात घट येते. परंतु आता तंत्रज्ञानामुळे तणाचा समूळ नायनाट करणे शक्य झाले आहे. अनेक यंत्रे देखील विकसित करण्यात आलेले आहेत. परंतु भारतामध्ये शेतीचे तुकडीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अशा लहान तुकड्यात यंत्र वापरण्यास खूप मोठ्या समस्या निर्माण होत होत्या.

परंतु आता अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचे ठरेल असे सनेडो नावाचे यंत्र विकसित करण्यात आले असून साधारणपणे रिक्षा ट्रॅक्टरच्या आकारासारखा या यंत्राचा आकार असून तीन आणि चार चाके देण्यात आलेले आहेत. या यंत्राचा वापर पिकांच्या आंतरशागतीकरिता करता येऊ शकतो. दहा एचपी क्षमता असलेले या यंत्राला इंजिन देण्यात आले असून प्रति तास हे यंत्र 800 मिली डिझेलच्या माध्यमातून खूप मोठ्या क्षेत्रातले तण नष्ट करू शकते. अल्पभूधारक शेतकरी या छोट्या यंत्राच्या मदतीने पिकातील तणांचा नायनाट करू शकतात.

 किती आहे या यंत्राची किंमत?

या यंत्राची किंमत एक लाख 25 हजार रुपये असून हे भारतामध्ये आता हे यंत्र विविध कंपन्यांच्या माध्यमातून तयार केले जात आहे. तसेच तुम्ही किती क्षमतेचे यंत्र घेणार आहेत त्यानुसार त्याची किंमत अवलंबून आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts