Sarkari Yojana : बदलत्या काळात भारतीय शेतीचे (Farming) चित्र संपूर्ण बदलत चालले आहे. पूर्वी शेतीकाम मजुरांच्या तसेच बैलांच्या साह्याने केले जात असे. मात्र आता यामध्ये यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात समावेश झाला आहे. आता शेतीची कामे यंत्राच्या सहाय्याने केली जात आहेत.
मित्रांनो शेतीची पूर्वमशागत ते अगदी पीक काढणीपर्यंत सर्व कामे ट्रॅक्टरच्या (Tractor) माध्यमातून केली जात आहेत. विशेष म्हणजे ट्रॅक्टर मजूरटंचाईचा सामना करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरत आहे. शेती कामासाठी मजूर टंचाई प्रकर्षाने जाणवत असल्याने आता ट्रॅक्टरचा वापर दिवसेंदिवस शेतीमध्ये वाढू लागला आहे. मात्र असे असले तरी प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकत घेणे हे शक्य नाही.
ट्रॅक्टरच्या किमती या अल्पभूधारक शेतकरी बांधवांच्या आवाक्याबाहेर असतात. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर प्रत्येक शेतकऱ्याला खरेदी करणे शक्य नाही. यामुळे आता याबाबत शासनाने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान (Tractor Subsidy) द्यायला सुरुवात केली आहे. मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी करता येणे अशक्य आहे अशा शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर अनुदान योजनेचा (Yojana) लाभ मिळत आहे.
मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या (Tractor Subsidy Scheme) माध्यमातून शेतकऱ्यांना (Farmer) 20 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. निश्चितच या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी करता येणे शक्य होणार आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 20 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
मित्रांनो अनुदानाची रक्कम ही ट्रॅक्टरच्या मूळ किमतीवर आधारित असते. म्हणजेच रोड ऑन प्राईसवर अनुदान दिले जात नाही. शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी करताना येणारा जीएसटी व इतर आवश्यक खर्च स्वतः करावा लागतो. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांकडून अर्ज मागवतात.
ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी निर्धारीत करण्यात आलेल्या पात्रता
मित्रांनो ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ देण्यासाठी सरकारने काही पात्रता निश्चित केल्या आहेत.
मित्रांनो ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
याशिवाय अर्जदार शेतकऱ्याकडे बँक खाते असणे अनिवार्य आहे. संबंधित बँक खात्याला आधार-पॅन लिंक्ड असणे महत्त्वाचे आहे.
तसेच ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ अशा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न केवळ दीड लाख रुपयांपर्यंत असेल.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ ज्या शेतकऱ्याकडे आधीच ट्रॅक्टर असेल त्यांना मिळणार नाही.
तसेच ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ शेतकरी बांधवांना फक्त एका ट्रॅक्टरच्या खरेदीवर दिला जाणार आहे.
ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
मित्रांनो जर शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, जमीनीचा पुरावा (सातबारा) प्रत, शेतकऱ्याचे बँक खाते-तपशील-पासबुकची प्रत, मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला, पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल बर….!
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, ट्रॅक्टर सबसिडी योजना 2022 साठी पात्र शेतकरी त्यांच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC पोर्टल) च्या मदतीने ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी करू शकणार आहेत. ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक माहिती घेणे हेतू शेतकरी बांधव कृषी विभागाला भेट देऊ शकतात.