कृषी

Sarkari Yojana Information: शेतकरी बांधवानो फक्त 55 रुपये जमा करा आणि महिन्याकाठी मिळवा 3 हजार; वाचा या योजनेची सविस्तर माहिती

Sarkari Yojana Information:मित्रांनो भारत एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे यामुळे भारत सरकार (Indian Government) शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या कल्याणकारी योजना अमलात आणत असते. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट व्हावी हाचं असतो.

अशाच शेतकरी हिताची योजना आहे पीएम किसान मानधन योजना (Pm Kisan Mandhan Yojana). या योजनेची सुरुवात शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना वृद्धापकाळात आर्थिक मदत मिळावी यासाठी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळाचे रक्षण करण्यासाठी पेन्शनची सुविधा दिली जाते.

मित्रांनो केंद्रसरकारच्या पीएम किसान मानधन महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपात हस्तांतरित केले जातात. मात्र यासाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला काही ठराविक रक्कम मायबाप शासन दरबारी जमा करावी लागते. यामुळे, तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्हाला पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला या योजनेत नोंदणी करावी लागणार आहे.

किती पैसे जमा करावे लागतील
ज्या शेतकरी बांधवाचे वय 18 वर्ष असेल त्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यासाठी दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. तसेच ज्या शेतकऱ्याचे वय 40 वर्षे असेल तर या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील.

कसं करणार रजिस्ट्रेशन
पीएम किसान मानधन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, लाभार्थ्याला प्रथम त्याच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.
यानंतर शेतकऱ्याला स्वत:चे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि त्याच्या जमिनीची कागदपत्रे केंद्रात सादर करावी लागतील.
याशिवाय बँक खात्याची सर्व माहिती द्यावी लागेल.


त्यानंतर शेतकर्‍यांना तेथे सापडलेला अर्ज त्यांच्या आधार कार्डशी लिंक करावा लागेल.
त्यानंतर पेन्शन खाते क्रमांक दिला जाईल.

काय आहे या योजनेसाठी पात्रता
पेन्शन योजना 2 हेक्टर जमीन असलेल्या लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी वृद्धावस्थेतील संरक्षण तसेच सामाजिक सुरक्षिततेसाठी आहे.
18 ते 40 वयोगटातील शेतकरी नोंदणी करून या योजनेच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकणार आहे.


पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खात्रीशीर पेन्शन मिळेल. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपये आणि जर त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या जोडीदाराला कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून 50% पेन्शन मिळण्यास पात्र असेल. लक्षात ठेवा, कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारालाच लागू आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts