Shimla Mirchi Lagwad : आपल्या देशात अलीकडे भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. भाजीपाला पिकात सिमला मिरचीचा देखील समावेश होतो. शिमला मिरचीची खपत पाहता या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
शिमला मिरची ही वेगवेगळ्या पदार्थात वापरली जाते. याचा वापर हा मुख्यत्वे चायनीज मेन्यू बनवण्यासाठी केला जातो. शिमला मिरची मध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळत असल्याने याची बाजारात मोठी मागणी असते.
असे असले तरी जाणकार लोक या पिकाच्या सुधारित जातींची शेती करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आपण शिमला मिरचीच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
शिमला मिरचीच्या जाती खालील प्रमाणे :-
शिमला मिरची ही हिरवी लाल आणि पिवळी रंगाची असते. याच्या वेगवेगळ्या प्रगत जाती बाजारात उपलब्ध आहेत.
इंद्रा :- शिमला मिरचीची ही एक प्रगत जात असून संकरित वाणामध्ये मोडते. या जातीचे पीक हे मध्यम उंचीचे असते. या जातीच्या शिमला मिरचीचे वजन 110 ते 150 ग्रॅम दरम्यान असते. या जातीपासून एकरी 110 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. निश्चितच या जातीची लागवड करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.
बॉम्बे रेड :– शिमला मिरचीची ही देखील एक प्रगत जात आहे. नावावरून आपल्या लक्षात आलेच असेल की ही मिरची लाल रंगाची असते. ही शिमला मिरची कच्ची असते तेव्हा हिरवी असते. पण पिकल्यानंतर हिचा रंग लाल होतो. या जातीला बाजारात मोठी मागणी असल्याने याची देखील शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.
ओरोबेल (येलो शिमला मिरची) :- शिमला मिरचीची ही देखील एक सुधारित जात आहे. या जातीची शिमला मिरची हिवाळ्यात लावली जाते. या जातीचे मिरची ही पिकल्यानंतर पिवळ्या कलरची होते. या जातीची शेती देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे मिरचीची ही जात वेगवेगळ्या रोगांशी लढण्यास सक्षम आहे.