Solar Trolly: शेती उत्तम पद्धतीने करण्यासाठी ज्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता खूप गरजेची आहे अगदी त्याच प्रमाणात विजेची मुबलक उपलब्धता देखील तितकेच गरजेची असते. कारण पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक पीक उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतो. त्यामुळे शेतकरी बंधू पिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता विहिरी तसेच बोरवेल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.
परंतु पाण्याची उपलब्धता बऱ्याचदा असते परंतु वीज वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे किंवा वारंवार खंडित होत असल्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही व त्याचा मोठा फटका हा पिक उत्पादनाला बसतो. तसेच अजून देखील बऱ्याच भागांमध्ये विजेची समस्या असल्यामुळे त्या ठिकाणी डिझेल पंप वापरले जातात व यांना डिझेल लागते.
परंतु जर सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहिल्या तर त्या उच्चांकी असून शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या नाहीत. तसेच विजेचे दर देखील खूप जास्त असल्याने त्याचा देखील फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे शेतकरी बंधू समोर या प्रकारच्या समस्या उद्भवतात व अशा समस्येपासून जर तुम्हाला मुक्तता मिळवायचे असेल तर काही शेतकरी देशांमध्ये सोलर ट्रॉलीच्या स्वरूपात एक चांगला ऊर्जेचा स्त्रोत असून त्याचा वापर करत आहेत. नेमके हे सोलर ट्रॉली काय आहे आणि त्याचे फायदे याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
सोलर ट्रॉलीचे वैशिष्ट्य
विजेच्या आणि इतर समस्येपासून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर सोलर ट्रॉली चा वापर फायद्याचा ठरू शकतो. सोलर ट्रॉली हे एक तांत्रिक उपकरण असून यामध्ये सौर पॅनल बसवलेले असतात. त्या माध्यमातून विजेची निर्मिती केली जाते व ती शेतीच्या विविध कामांकरिता वापरता येते. तसेच सोलर ट्रॉली एका ठिकाणहून दुसरीकडे नेता येणे अगदी सोपे आहे. त्यामुळे शेतकरी अनेक कामे या सोलर ट्रॉलीच्या मदतीने करू शकतात.
शेतामध्ये तुम्ही शेतीशी संबंधित अनेक कामे सहजपणे या माध्यमातून करू शकतात. तुम्हाला जर शेतामध्ये सिंचन करायचे असेल तरीदेखील तुम्ही एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये ही सोलर ट्रॉली आरामात नेऊ शकतात. शेतीच नाही तर तुम्ही घरगुती कामासाठी देखील या ट्रॉलीचा वापर करू शकतात.
कारण या ट्रॉलीच्या सहाय्याने वीज निर्माण होत असल्यामुळे त्यात निर्माण झालेल्या विजेचा वापर तुम्ही शेतात करू शकतात. त्यामुळे नक्कीच विजेचा लपंडाव किंवा वीज नसण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळते व डिझेल वर जर तुमचा खर्च होत असेल तर त्यापासून देखील मुक्तता मिळते. या सोलर ट्रॉलीच्या मदतीने तुम्ही तुमच्या शेतातील बरीच कामे आरामात करू शकतात व ती इतर शेतकऱ्यांना भाड्याने देऊन देखील चांगला नफा मिळव
सोलर ट्रॉलीचे वैशिष्ट्ये
या ट्रॉली सोलर पंप देखील एक वैशिष्ट्यपूर्ण असून हा तुम्ही अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात. याला चालवण्याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची डिझेल किंवा विजेची गरज भासत नाही. जेव्हा तुम्हाला शेतात याची गरज नसते तेव्हा तुम्ही घरी सौर ऊर्जेपासून वीज तयार करून ती वापरू शकतात. तसेच तुम्हाला ज्या ठिकाणी याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी याचा वापर करू शकतात. इतर शेतकऱ्यांना देखील तुम्ही भाड्याने सोलर ट्रॉली देऊन चांगला नफा मिळवू शकतात.
ही सोलर ट्रॉली खरेदी करायची तर या ठिकाणी करा संपर्क
तुम्हाला देखील ही सोलर ट्रॉली खरेदी करायची असेल तर तुम्ही लूम सोलर या कंपनीच्या www.loomsolar.com या संकेतस्थळावर जाऊन माहिती घेऊ शकतात.