अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- शेती क्षेत्रात (Agriculture sector) बदलत्या काळानुसार बदल आत्मसात करणे महत्त्वाचे ठरत आहे.
पिढ्यानपिढ्या (Generation after generation) चालत आलेल्या पारंपरिक शेती (Traditional farming) पद्धतीतून शेतकरी बांधवांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे कठीण आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी काळाच्या ओघात पीक पद्धतीत (Crop System) मोठा बदल करणे अनिवार्य आहे, आधुनिकतेची कास धरून शेती केल्यास आर्थिक सुबत्ता सहजरीत्या प्राप्त केली जाऊ शकते.
याचीच प्रचिती समोर आली आहे ती बीड (Beed) जिल्ह्यातून. जिल्ह्याच्या केज तालुक्यातील काही नवयुवक शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून पारंपारिक पिकाला बगल देत नगदी व भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करून चांगला बक्कळ नफा कमावला आहे.
केज तालुक्याचा मौजे साळेगाव येथील काही उच्चशिक्षित तरुणांनी झेंडू, सिमला मिरची, टोमॅटो, टरबूज, खरबूज, हळद, केळी पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न प्राप्त केले आहे.
या तरुणांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती फायद्याची असल्याचे नमूद केले आहे. मौजे साळेगाव येथील अनेक सुशिक्षित तरुण आता शेतीकडे वळले आहेत.
शेती क्षेत्रात कमाई करण्याची अपार शक्यता असल्याने या सुशिक्षित तरूणांनी शेतीची कास धरली. विशेष म्हणजे या तरुणांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा दिला आणि आधुनिक पद्धतीने शेती यशस्वी करून दाखवली.
मौजे साळेगावच्या ज्या शेतजमिनीत केवळ कुसळे आणि बाजरी ज्वारी एवढेच उगवत होते त्या शेतजमिनीत साळेगाव च्या भूमिपुत्रांनी आधुनिक पद्धतीने शेती करून दाखवली.
साळेगावचे अविनाश गीते, गजानन इंगळे या तरुणांनी आधुनिक पद्धतीने शेती करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही तरुण कृषी पदवीधारक आहेत.
यांच्यासमवेत याच गावातील इतरही अनेक सुशिक्षित तरुण शेती करू लागले आहेत. या तरुण शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित शेतजमिनीत पारंपरिक पिकाला फाटा दिला आणि झेंडू, सिमला मिरची, टोमॅटो, टरबूज, खरबूज, हळद, केळी या पिकांची लागवड केली.
या तरुण शेतकऱ्यांना या पिकातून चांगला नफा मिळत आहे. या तरुणांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेती खूपच अधिक फायद्याचे असल्याचे दाखवून दिले आहे.
साळेगावचे हे सुशिक्षित शेतकरी इतर नवयुवक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. शेतकरी पुत्रांनी या तरुणांचा आदर्श घेत शेतीकडे वळले पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे यामुळे निश्चितच शेतीही फायद्याची ठरणार आहे.