कृषी

Soyabean News : सोयाबीनचे पीक आले काढणीला, ‘या’ गोष्टींची शेतकऱ्यांना……

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 Krushi news : यंदाच्या वर्षी प्रथमच शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल करून उन्हाळी हंगामात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे.

शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड नुसतीच केली नसून ते यशस्वीही करून दाखवली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शिवारात सोयाबीनला शेंगा लगडल्या असून शेंगांचे वजन पेलत नसल्यामुळे शेंगा जमिनीला टेकल्या आहेत.

काही भागात सोयाबीनला शेवटचे पाणी देण्याची तयारी शेतकरी करत आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या पाण्याच्या वेळी झाडांची मुळे ही चालू असते.

त्यामुळे पाठ पाण्यातून एकरी 10 किलो म्युरेट ऑफ पोटॅश चा वापर करावा. म्युरेट ऑफ पोटॅच्या वापरामुळे सोयाबीनचे दाणे भरण्यास चांगली मदत होते.

शेवटच्या वेळी सुष्मअन्नद्रव्यांची फवारणी करण्यास शेतकरी टाळाटाळ करतात. पण फवारणी केल्यास दाणे भरण्याच्या अवस्थेत ही अन्नद्रव्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

सोयाबीनचे काढणीचे नियोजण हे सोयाबीनच्या झाडाची पाने वाळू लागताच करावे लागते. तर काढणी व नंतर मळणी दरम्यान लागणाऱ्या मजुरांचा अंदाज घेणे गरजेचे आसते.

कारण सोयाबीन पीक काढणीच्या वेळी मजूरटंचाई सर्वत्र दिसून येत असते. सोयाबीन पीक काढण्याच्या वेळी शेतकऱ्याला योग्य वेळ आणि योग्य नियोजन करावे लागणार आहे.

कारण वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे काढणी झाल्यानंतर सोयाबीन चा एकाच ठिकाणी ढिगारा घालणे गरजेचे आहे. जेणेकरून जर वातावरणात बदल झाल्यास पावसामुळे काढलेले सोयाबीन भिजणार नाही.

यासाठी ताडपत्रीची सोय शेतकऱ्याला करावी लागणार आहे. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास शेतकऱ्याचे वातावरणातील बदलामुळे नुकसान न होता उत्पादन वाढ होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts