अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Krushi News :- यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी शेतात प्रथमच उन्हाळी सोयाबीन ची लागवड केली असून मागील हंगामात अवकळा मुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळी हंगामात सोयाबीनची लागवड केलेली दिसत आहे.
तर यावर्षी पाणीसाठाही मुबलक स्वरूपात असल्यामुळे आणि गेल्या महिन्यापासून सोयाबीन ला चांगली दर मिळत असल्यामुळे परिणामी उन्हाळी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली.
उन्हाळी हंगामाती टोकण केलेल्या सोयाबीनच्या वाणाला वेगवेगळे समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. तर त्याचे योग्य वेळेचे नियोजन केल्यास होणाऱ्या नुकसानीस वेळेत आळा घालता येऊ शकतो.
त्यामध्ये सोयाबीनचे वान फुले संगम केडीएस-७२६ ह्या वाणाचा लागवड केली असेल तर त्याची वाढ आता थांबली पाहिजे होती.पण प्रथमच ह्या वाणाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा मनात चिंतेने घर केले आहे. सोयाबीन कमरेला पोहचले अजूनही त्याची वाढ सुरूच आहे.
तर या वानाच्या लागवडी दरम्यान शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पुढील वाढीचा अंदाज न लागल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली अशा शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची दाटी झाली असून त्याचा परिणाम कमी उत्पादनावर होणार आहे.
काही ठिकाणी झाडाला आपले वजन न पेलल्यामुळे झाडं जमिनीला स्पर्श करत आहेत. बऱ्याच शंका कुशंका आणि भीती ह्या वाणाचा भोवताली फिरत आहेत. असा वाण आपण प्रथमच बघत आहोत.
त्याचा स्वभाव,त्याचे गुणधर्म आणि आपले पूर्वीचे अनुभव ह्या मध्ये तफावत जाणवू लागली आहे. त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना जाणवून आले आहे. की या वाणाचे टोकण पद्धत ही 9 इंचाच्या पुढे ठेवणे गरजेचे आहे.
सोयाबीनला००:५२:३४ चे दोन ते तीन फवारण्या झाल्या असून सोयाबीनच्या वाढीमुळे पुढील फवारणी करण्यास अडचण निर्माण होत आहे.जर फवारणी करणे शक्य असेल तर ००:००:५०(पोटॅशियम सल्फेट) एकरी एक किलो ह्या प्रमाणात दोन फवारण्या कराव्यात. पोटॅशियम सल्फेट मुळे शेंगा चांगले भरतात.
सोयाबीन पिकावर 90 दिवसांच्या पुढे रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असते. त्यासाठी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोनाझोल १० % डब्लू.पी. + सल्फर ६५ % डब्लू.जी. २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करून घ्यावी.