Soybean Bajarbhav : मित्रांनो, सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणारा एक मुख्य पीक. या पिकाच्या उत्पन्नावर (Farmer Income) अनेक शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते.
शिवाय गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजारभाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान यावर्षी 1 ऑक्टोबरपासून सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. मात्र हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव (Soybean Market Price) दबावात आहेत.
शेतकऱ्यांच्या मते नवीन सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आणि व्यापाऱ्यांनी नवीन सोयाबीनचा बाजारभाव हाणून पाडला. दरम्यान, सोयाबीनची काढणी अनेक ठिकाणी परतीच्या पावसामुळे प्रभावित होत आहे. शिवाय पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. यामुळे सोयाबीन पिकाचा दर्जा खालावला आहे.
तसेच सध्या बाजारात आवक होत असलेल्या सोयाबीन मध्ये ओलावा देखील अधिक आहे. सोयाबीनमध्ये ओलावा अधिक आहे मात्र दिवाळीच्या पर्वावर शेतकऱ्यांना हात खर्चाला पैसे आवश्यक आहेत अशा परिस्थितीत सोयाबीन विक्री वाढली आहे. यामुळे सध्या ओलावा असलेला नवीन सोयाबीन 4 हजार रुपये प्रति क्विंटल ते 4700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते सोयाबीन मध्ये असलेला ओलावा कमी झाल्यानंतर सोयाबीनचे बाजार भाव वाढणार आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते, शेतकरी बांधव सोयाबीन काढणी झाल्यानंतर लगेचच सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यामुळे सोयाबीनमध्ये ओलावा अधिक असून याला कमी बाजार भाव मिळत आहे. शिवाय बाजारात दाखल होणारा सोयाबीन एफएक्यू सोयाबीन अर्थातच 10 टक्के ओलावा 2% काडी कचरा आणि 2% तुटफूट या प्रकारचा नाही.
यामुळे सध्या सोयाबीनला दर्जानुसार दर मिळत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किमती वधारल्या असल्याने याचा आधार सोया तेलाच्या किमतीला देखील मिळत आहे. मित्रांनो हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार सोया तेलाचे भाव दहा टक्के वाढले आहेत. मात्र असे असले तरी अजूनही सोयाबीन बाजार भावात अपेक्षित अशी वाढ झालेली नाही. फक्त एफएक्यू दर्जाचा सोयाबीनचे बाजार भाव वाढले आहेत.
ओलावा अधिक असलेला सोयाबीन अजूनही कमी भावात विक्री होत आहे. शिवाय भविष्यात सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाचे दर वाढणार असल्याने सोयाबीन बाजार भाव वधारणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय परतीच्या पावसामुळे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात सोयाबीन पिकाची मोठी हानी झाली आहे.
अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादनात घट होणार आहे मात्र नेमके किती नुकसान आणि उत्पादनात नेमकी किती घट होणार याबाबत अधिकृत आकडा अजूनतरी समोर आलेला नाही. हा आकडा समोर आल्यानंतर निश्चितच सोयाबीन बाजारात एक मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो. जाणकार लोकांच्या मते, परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे अधिक नुकसान झालेले असल्यास सोयाबीनचे दर कमालीचे वधारू शकतात.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सध्या नवीन सोयाबीन चार हजार रुपये प्रतिक्विंटल ते 4700 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान विक्री होत आहे. तसेच जुना सोयाबीन पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे.
तसेच जाणकार लोकांच्या मते, सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव गृहीत धरून सोयाबीनची बाजाराचा आढावा घेऊन विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.