कृषी

Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ! सोयाबीन तेलात होणार मोठी वाढ ; सोयाबीन दर ‘इतके’ वाढणार

Soybean Bajarbhav : मित्रांनो सोयाबीन तेलाच्या बाजारभावात  गेल्या काही दिवसांपासून वाढ नमूद केली जात आहे. पाम तेलाचे भाव दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने सोयाबीन तेलाचे भाव देखील वधारत आहेत.

पाम तेलाचे भाव जवळपास वीस टक्‍क्‍यांनी वाढले आहेत अशा परिस्थितीत सोयाबीन तेलाचे भाव देखील वाढत आहेत. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन तेल जवळपास दहा टक्क्यांनी वधारले आहे. अशा परिस्थितीत याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

दरम्यान सोयाबीन तेलाच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, जागतिक पाम तेल उत्पादनात मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. या दोन देशात जगात एकूण उत्पादित होणारे पाम तेलापैकी जवळपास 80 टक्के उत्पादन होते. विदेशात नोव्हेंबरपासून पाम तेल उत्पादन घटत जाते.

यावर्षी हवामान बदलामुळे पाम तेलाचे उत्पादन या दोन्ही देशात कमालीचे कमी होणार असल्याचा दावा केला गेला आहे. अशा परिस्थितीत पाम तेल उत्पादन कमी होऊन पाम तेलाचे भाव वधारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सहाजिकच पाम तेलाचे भाव वधारले म्हणजेच सोयाबीन तेलाला मागणी येणार असून सोयाबीन तेलाचे भाव देखील वधारु शकतात.

निश्चितच सोयाबीन तेलाचे भाव वाढलेत म्हणजेच सोयाबीन बाजार भावात सुधारणा होण्याची दाट शक्यता निर्माण होते. हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार जागतिक बाजारपेठेत सोया तेलाचे 13 टक्‍क्‍यांनी भाव वधारले असून देशांतर्गत बाजारपेठेत तब्बल दहा टक्क्यांनी सोया तेलात वाढ झाली आहे.

सध्या जुन्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. न lव सोयाबीन मात्र चार हजार रुपये प्रति क्‍विंटल ते 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. मात्र जाणकार लोकांच्या मते सोया तेलाला मागणी वाढली असल्याने आणि सोया तेलाचे दर वधारले असल्याने सोयाबीन बाजार भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुढील महिनाभरात सोयाबीन 5700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे स्पष्ट केले आहे. निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना यापेक्षा अधिक बाजारभाव अपेक्षित आहे.

मात्र या वर्षी सोयाबीन बाजारभाव चांगले दबावात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा आढावा घेत सोयाबीनची विक्री चालू ठेवणे त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts