Krushi News Marathi: मित्रांनो भारतात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची शेती केली जाते. सोयाबीन आपल्या राज्यात देखील खरीप हंगामा मोठ्या प्रमाणात पेरले जात असून खरीप हंगामातील एक मुख्य पीक म्हणून सोयाबीनला ओळखले जाते.
मित्रांनो खरं पाहता सोयाबीन एक प्रमुख तेलबिया पिकांपैकी एक आहे. मात्र सोयाबीनचा नैसर्गिक वास आवडत नसल्यामुळे बरेच लोक त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ वापरणे टाळतात, परंतु भारतीय सोयाबीन संशोधन संस्था (IISR), इंदूर येथील शास्त्रज्ञांनी ते मोडून काढले आहे आणि सोयाबीनच्या नको असलेल्या वासापासून मुक्त वाण तयार केले आहे.
नव्याने विकसित केलेल्या या सोयाबीनच्या जातीमुळे निश्चितच शेतकरी बांधवांना तसेच सामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे. आयआयएसआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
IISR प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बी यु दुपारे यांनी माहिती दिली की इंदूर येथे अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्पाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या 52 व्या वार्षिक गटाच्या बैठकीत, सुधारित सोयाबीन जाती ‘NRC 150’ च्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे.
“आयआयएसआर शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या संशोधनानंतर विकसित केलेली ही जात सोयाबीनच्या नैसर्गिक वासासाठी जबाबदार असलेल्या लिपोक्सीजेनेस-2 एन्झाइमपासून मुक्त आहे.
म्हणजेच सोया दूध, सोया पनीर, सोया टोफू इत्यादीपासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये त्याचा वास येणार नाही.” दुपारे म्हणाले की, सोयाबीनची ‘NRC 150’ ही जात प्रथिने आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
सोयाबीनच्या नवीन जाती येत असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे तसेच पोषक घटकांमुळे कुपोषण सारख्या आजारामध्ये हे सोयाबीन प्रभावी ठरणार आहे.
अवांछित दुर्गंधीमुक्त असल्याने या सोयाबीनच्या जातीपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा वापर सर्वसामान्यांमध्ये वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भारतात सोयाबीनचे सुमारे 120 लाख टन उत्पादन खरं पाहता भारतात मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते.
या पाठोपाठ आपल्या महाराष्ट्रात देखील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या पिकावर अवलंबून आहे. मित्रांनो राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी सोयाबीनची लागवड करतात.
मित्रांनो वैश्विक स्तरावर जर विचार केला तर जगात अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना यांसारख्या देशांमध्ये सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. एकूण सोयाबीन उत्पादनात या तीन देशांचे वर्चस्व गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगामध्ये 80 टक्के सोयाबीनचा पुरवठा या तीन देशातून केला जातो. आपल्या भारतात देखील सोयाबीनचे चांगले बक्कळ उत्पादन घेतले जाते. देशात सुमारे 120 लाख टन सोयाबीनचे उत्पादन होते.
मध्य प्रदेशात गेल्या वर्षी सोयाबीन पिकावर किडींचा हल्ला झाला होता आणि प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता.
यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या वर्षी मध्य प्रदेशात 41.8 लाख टन तर महाराष्ट्रात 45.44 लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले होते.
यावर्षी मात्र मध्यप्रदेशमध्ये सोयाबीनचे नेहमीप्रमाणेच दर्जेदार उत्पादन झाले मध्य प्रदेशात यावर्षी सुमारे 52 लाख टन आणि महाराष्ट्रात 48 लाख टन उत्पादन झाले. यामुळे मध्यप्रदेश सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत आजही अव्वल स्थानी कायम आहे.