कृषी

Soybean Farming Guide : सोयाबीन पिकावर खोडमाशी किटकाचा प्रादुर्भाव! ‘ही’ फवारणी करा, किटकाचा नायनाट होणारं

Soybean Farming Guide : राज्यात या वर्षी मान्सूनचे (Monsoon) आगमन काही ठिकाणी खूपच उशिरा झाले. त्यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पीक (Soybean Crop) पेरणीला उशीर झाला.

पेरणीला (soybean farming) उशीर झाल्यामुळे तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस (Rain) पडल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर मोठा विपरित परिणाम झाला आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या कीटकांचा (Soybean Pest) प्रादुर्भाव झाला आहे.

राज्यात सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशी या कीटकाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. जाणकार लोकांच्या मते या कीटकांमुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. अशा परिस्थितीत या कीटकांवर वेळीच नियंत्रण (Soybean Pest Control) मिळवणे आवश्यक आहे.

खोडमाशी कीटक नियंत्रण कसं करणार बर…!

जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाचे वेळोवेळी निरीक्षण केले पाहिजे. तसेच सोयाबीन पिकात तण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. खोडमाशी आढळून आलेले झाड शेताबाहेर काढावे आणि नष्ट करावे.

या कीटकाचा आवर घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे. यासाठी शेतकरी बांधवांनी निंबोळी अर्क 5% 5 मिली एक लिटर पाण्यासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करावी.

जाणकार लोकांच्या मते सोयाबीनच्या वावरात दहा ते 15 टक्के सोयाबीनचे पिक खोडमाशी या कीटकांने बाधित असल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्याचे समजावे. आणि शेतकरी बांधवांनी याच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

खोडमाशी किटकाने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक पद्धतीने यावर नियंत्रण मिळवले पाहिजे.

रासायनिक नियंत्रण म्हणून शेतकरी बांधवांनी प्रति दहा लिटर पाण्‍यात 2.5 मिली थायामिथोक्झाम (12.6)+ लॅम्ब्डासायहॅलोथ्रीन (9.5 ZC) किंवा 3 मिली क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (18.5 SC) किंवा 30 मिली ईथीऑन (50 ईसी) किंवा 7 मिली इंडोक्झाकार्ब (15.80 ईसी) किंवा 6 मिली लॅम्ब्डासायहॅलोथ्रीन (4.9 सीएस) यापैकी कोणत्‍याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.

शेतकरी बांधवांनी औषध फवारणी करताना काळजी घ्यावी. डोळ्याला सनग्लासेस आणि हातात ग्लोज घालून फवारणी करावी. तसेच शेतकरी बांधवांनी कोणत्या औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा सल्ला घ्यावा. दिलेली माहिती ही कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही याची नोंद घ्यावी.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts