Soybean Farming: भारतात सोयाबीन (Soybean Crop) हे एक मुख्य पिक आहे. याची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Crop) केली जाते. देशात मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक सोयाबीनची लागवड केली जात असून या राज्याचा सोयाबीन उत्पादनात देशात प्रथम क्रमांक लागतो.
मध्यप्रदेश पाठोपाठ आपला महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) देशात दुसरा क्रमांकावर विराजमान आहे. म्हणजेच आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन पिकाची शेती करत असतात. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean Grower Farmer) आजची ही बातमी खास आहे.
मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून भारतात सर्वत्र दुसऱ्या चरणातील मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील पावसाने अक्षरश थैमान माजवल आहे. अशा परिस्थितीत, पावसामुळे सोयाबीन पीक पुरतं संकटात सापडल आहे. यामुळे पावसापासून सोयाबीन पिकाचे कशा पद्धतीने रक्षण केले जाऊ शकते (Soybean Crop Management) किंवा पाऊस उघडल्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी कोणत्या उपाययोजना (Soybean Pest Control) केल्या पाहिजेत जेणेकरून सोयाबीनचे पीक सडणार नाही किंवा सोयाबीन पिकाची काहीच हानी होणार नाही याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. शेतात सोयाबीन, मूग, उडीद लागवड केली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे, त्यामुळे सोयाबीन सडून त्याचे उत्पादन कमी होईल किंवा बिया हलके होण्याची शक्यता आहे. यामुळे जाणकार लोकांच्या मते, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात अजिबात पाणी साचू देऊ नये. हे लक्षात ठेवले पाहिजे की, कोणत्याही स्थितीत शेतात पाच दिवसांपेक्षा जास्त पाणी राहू नये, जेणेकरून पीक खराब होणार नाही. पाच दिवसांपासून शेतात पाणी तुंबले असेल, जर शेतकरी नाल्याची व्यवस्था करू शकत नसेल, तर लगेच पाणी काढून टाकावे.
युरिया किंवा पाण्यात विरघळणारे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची फवारणी करा. जेणेकरून पीक खराब होण्यापासून वाचेल आणि चांगले उत्पादन मिळू शकेल. हवामान खुले झाल्यास खरीप पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी शेतात प्रोफेनोफॉस, सायपरमेथ्रीन यासारखी कीटकनाशके वापरावीत जेणेकरून नुकसान होणार नाही.
इथे दिलेली माहिती ही कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही. शेतकरी बांधवांनी कोणत्याही औषधाची कोणत्याही पिकावर फवारणी करण्याअगोदर तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक राहणार आहे.