कृषी

Soybean Price : ‘या’ कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत आहे सोयाबीनचे भाव ! येणाऱ्या कालावधीत भारतात कसा राहील बाजार भाव?

Soybean Market Price :- यावर्षी महाराष्ट्रात आणि एकंदरीत भारताचा विचार केला तर पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

आता नवीन सोयाबीन बाजारात येऊ लागले आहे परंतु उत्पादन कमी असताना देखील बाजारभावावर मात्र दबाव असल्याचे सध्या चित्र आहे. जागतिक स्तरावर जर सोयाबीनच्या बाजाराचा विचार केला तर त्या ठिकाणी सोयाबीन आणि सोयापेंड दरामध्ये एक टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले व त्याचाच परिणाम हा देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात देखील 50 रुपयांची क्विंटल मागे चढउतार सुरू आहे.

भारतामध्ये वायदे बंद आहे परंतु काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयांचा बाजार भाव मिळाला आहे. सोयापेंड 42 हजार ते 43 हजार रुपये प्रति टन विकले जात आहे.

जर आपण अमेरिकेचा विचार केला तर त्या ठिकाणी सोयापेंड आणि सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झालेली आहे. नेमकी ही वाढ कशामुळे झाली आहे? मागील काही महत्त्वाची कारणे आपण बघू.

अमेरिकेत सोयापेंड आणि सोयाबीनच्या बाजारभावात का झाली वाढ?

जर आपण त्या ठिकाणचा विचार केला तर जैवइंधनाकरिता सोयातेलला मागणी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या ठिकाणी सोयातेलचे भाव वाढले आहेत. तसेच त्या ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे देखील सोयाबीनचे उत्पादन घटले आहे व त्याचाच परिणाम सोयाबीनच्या दरांवर दिसून येत आहे.

जर आपण अमेरिका व्यतिरिक्त अर्जेंटिनाचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील मागच्या हंगामात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले असून सोया पेंड व सोया तेलाची निर्यात देखील कमी झालेली आहे.

तसेच अमेरिकेच्या सोयाबीनला चांगला उठाव मिळत असून त्यामागे ब्राझील येथील सोयाबीन निर्यातीमध्ये ज्या काही अडचणी आहेत हे प्रमुख कारण ठरत आहे. तसेच चीन अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर सोया पेंड व सोयाबीनची आयात करत असल्यामुळे देखील त्या ठिकाणी दरांमध्ये वाढ दिसून येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

परंतु भारतात मात्र सोयाबीन दरांवर दबाव

भारतामध्ये सोयाबीनच्या दरांवर दबाव दिसून येत आहे व त्याच्या मागील सर्वात प्रमुख कारण म्हणजे खाद्यतेलाचे भाव पडल्यामुळे हा दबाव प्रामुख्याने दिसून येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील सोयाबीनचे भाव कमीच होते व त्याचाच प्रभाव हा भारतातील सोयाबीन दर दबावात असल्यावर झाला आहे.

परंतु मागच्या दोन आठवड्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोया पेंडने 400 डॉलरचा टप्पा पार केला होता व त्यामुळे देशात देखील क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची भाव वाढ किंवा सुधारणा झालेली बघायला मिळाली. सध्या जर आपण भाव पातळी बघितली तर ती सरासरी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये दरम्यान पोहोचली.

येणाऱ्या काळात कसे राहतील भारतात सोयाबीनचे दर?

आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोयाबीनचे स्थिती किंवा सोयाबीन बाजारभावाचा परिणाम हा भारतातील बाजारपेठेवर नक्कीच होऊ शकतो. ब्राझील या देशाचा विचार केला तर त्या ठिकाणी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्राझील पाठोपाठ अर्जंटीना येथे देखील सोयाबीन उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु त्या ठिकाणी बाजारभावात किती सुधारणा होईल हे आता सांगणे कठीण आहे कारण त्या ठिकाणी आत्ताशी सोयाबीनची पेरणी सुरू झालेली आहे. जरी ब्राझीलमध्ये यावर्षी उत्पादनात वाढ झाली तरीदेखील त्या ठिकाणहून आशियात माल आणायला जास्तीचा खर्च होतो.

तसेच कमी प्रमाणात माल देखील आणता येत नाही. त्यामुळे आपल्या शेजारील जे काही देश आहेत ते भारताकडूनच सोया पेंड घेतात. सध्या सोया पेंड निर्यातीचे सौदे सुरू झालेले आहेत. तसेच खाद्यतेलची जी काही निर्यात करण्यात येत होती ती देखील ऑक्टोबर महिन्यापासून कमी झालेली आहे.

त्यामुळे या सगळ्या कारणांचा जर विचार केला तर येणाऱ्या कालावधीत सोयाबीनचे दर कमी होतील अशी शक्यता मुळीच नाही. जर सध्याची बाजारपेठेतील स्थिती पाहिली तर येणाऱ्या काळात सोयाबीनची दरपातळी साडेपाच हजार रुपये प्रतीक्विंटल पर्यंत वाढू शकते अशी देखील शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts