कृषी

Spray Agriculture Jugaad: फवारणीचा शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड! एक दिवसात 2 व्यक्ती करतील 10 ते 15 एकर शेताची फवारणी, पहा व्हिडिओ

Spray Agriculture Jugaad:- पिक संरक्षणामध्ये पिकांवर पडणाऱ्या विविध प्रकारचे रोग व किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरिता विविध प्रकारच्या कीडनाशकांची फवारणी केली जाते. परंतु जर आपण पिकांवर करायच्या फवारणीचा विचार केला तर याकरिता बराच वेळ वाया जातो.

या मध्ये जर आपण पाठीवरचा पंप म्हणजेच नॅपसॅक स्प्रे पंपाने जर फवारणी करायचे ठरले तर संपूर्ण दिवसभर पाठीवर पंप टांगून पिकामध्ये आपल्याला फिरावे लागते. त्यामुळे हे काम खूप कष्टाचे असते व याला वेळ देखील भरपूर लागतो. तसेच मजुरां करवी हे काम करायचे म्हटले तरी देखील मजुरांची टंचाई असल्यामुळे वेळेवर मजूर मिळालाच याची शाश्वती नाही.

तसेच काही फळ पिकांमध्ये ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्राच्या साह्याने फवारणीचे काम करता येते. परंतु याला देखील खर्च बराच लागतो. त्यामुळे या सगळ्या समस्येवर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून अनेक प्रकारचे जुगाड शोधले जातात. असाच एक भन्नाट जुगाड फवारणीसाठी शेतकऱ्याने बनवला असून या जुगाडाच्या माध्यमातून  एका दिवसात दोन व्यक्ती दहा एकर पर्यंत शेतीचे फवारणी आरामात करू शकतात.

 अशाप्रकारे बनवला आहे हा फवारणी जुगाड

या जुगाड मध्ये दोन प्रकारचे पंपा घेतलेले असून त्याला एक प्रकारची नळी जोडलेली आहे व त्यावर एक स्टीलची नळी जोडलेली आहे. ही सेटिंग अशा पद्धतीने केलेली आहे की त्याला दोन्ही बाजूने दोन माणसं धरू शकतील आणि मध्यभागी त्या नळीच्या खूप सारे फवारे पडतील अशी सोय करण्यात आलेली आहे.

हे जुगाड अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले असून तुम्ही घरी देखील कमी खर्चात हे बनवू शकतात. ते जुगाड बॅटरी चलीत पंपाच्या साह्याने बनवलेले आहे व जलद काम करण्यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी चार ते पाच माणसांची गरज भासणार होती त्या ठिकाणी फक्त दोनच माणसं इतके काम करू शकणार आहेत. या जुगाडाच्या सहाय्याने कमीत कमी दहा एकर शेती वरील पिकांची फवारणी करता येईल हे मात्र नक्की.

 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts