अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकरी निघालेल्या उत्पादनातून अधिकचा नफा मिळावा या उद्देशाने माल साठवणूक करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र शेतकऱ्यांमध्ये माल साठवणूकी विषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. माल साठवून योग्य प्रकारे झाली तर ठीक नाहीतर साठवणूक केलेला माल हा लवकर खराब होण्याची शक्यता असते.
त्यासाठी माल साठवणूक करताना शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांनी दिलेला सल्ला लक्षात घेऊनच साठवणूक केली पाहिजे. त्यात भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा येथील कृषी तज्ज्ञांनी दिलेला सल्ला शेतकऱ्यांसाठी मोलाचा ठरत आहे.
शेतकऱ्यांना गव्हाची साठवणूक करायची असेल तर शेतकऱ्यांनी साठवणूक करण्याचे ठिकाण किंवा गोदाम हे स्वच्छ करून घेतले पाहिजे गोदामाच्या छताला छिद्रे किंवा भिंतीला भेगा पडल्या असल्यास त्या साठवणुकीच्या पूर्वी भरून व दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.
कारण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे धान्याची योग्य वेळेतच साठवणूक करणे गरजेचे झाली आहे. शिवाय धान्यातील आद्रतेचे प्रमाण हे 12 टक्क्यांपेक्षा अधिक नसले पाहिजे. योग्य प्रकारे साठवणूक झाल्यास पुढे होणाऱ्या भाववाढीचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.