कृषी

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक सिंचनाऐवजी खतांसाठी अनुदान

 Agricultural News : फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत आता १५ फळपिकांचा समावेश करण्यात आला असून यापुढे ठिबक सिंचनाऐवजी खतांसाठी अनुदान देण्याचा शासन निर्णय कृषी विभागाच्या वतीने जारी करण्यात आला आहे.

फळबाग लागवडीला ठिबक सिंचनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत मुंडे यांनी आवश्यकता भासल्यास १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहितीही दिली आहे. राज्य सरकारने ६ जुलै २०१८ रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबवण्यास मान्यता दिली असून

यामध्ये १५ फळपकांचा समावेश करण्यात आला आहे. खड्डे खोदणे, कलम लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येत होते. यामध्ये आता सुधारित मापदंड लागू करण्यात आले असून मजुरीसाठीदेखील वाढीव खर्च देण्यात येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts