कृषी

शेतकऱ्यांच्या पोरांचा नादच खुळा…! शेतकरी लेकान तयार केली चक्क ऑटोमॅटिक हायड्रोजन कार, 150 रुपयात 250 किलोमीटर धावणार

Success Story : शेतकरी बांधव (Farmer) कायमच शेतीमध्ये (Farming) वेगवेगळे प्रयोग करत चर्चेत येत असतात. आज आपण अशा एका शेतकरी पुत्राची कामगिरी जाणून घेणार आहोत जो शेतीमधील आपल्या प्रयोगासाठी नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

मित्रांनो आज आपण एका यवतमाळच्या (Yavatmal) शेतकऱ्याच्या लेकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करत एक भन्नाट कार (Farmer Make Hydrogen Car) विकसित केली आहे. या शेतकरी लेकाने चक्क हायड्रोजन वर चालणारी ऑटोमॅटिक कार (Automatic Car) बनवण्याचा पराक्रम केला आहे. यामुळे सध्या या शेतकरी लेकाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील हर्षल नक्षणे नामक शेतकरी पुत्राने हायड्रोजन वर चालणाऱ्या कारची निर्मिती करुन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. विशेष म्हणजे ही कार ऑटोमॅटिक आहे. याहुन विशेष बाब म्हणजे या शेतकरी पुत्राने तयार केलेली ही हायड्रोजन कार अवघ्या दीडशे रुपयात अडीचशे किलोमीटरचा प्रवास पार करणार आहे. यामुळे शेतकरी पुत्राचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मित्रांनो खरे पाहता देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडत आहेत. या परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला कार चालवणे हे आवाक्याबाहेरचे वाटू लागले आहे. साधी एक टू व्हीलर देखील आजच्या काळात चालवणे परवडत नाही.

या परिस्थितीचे भान ठेवत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील हर्षल यांनी आपल्या एका मित्राच्या सोबतीने इंधन दरवाढीवर मात करण्यासाठी काहीतरी जरा हटके करण्याचा विचार केला. मग काय हर्षल यांनी आपला मित्र कुणाल आसुटकर यांच्यासोबत मिळून कमी खर्चात जास्त पल्ल्याचा प्रवास करणारी आणि प्रदूषणमुक्त अशी सोनिक कार विकसित केली आहे. त्यामुळे या दोघा शेतकरी पुत्रांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शेतकरी पुत्र हर्षल लक्षणे यांनी एमटेक पर्यंत शिक्षण घेतल आहे. हर्षल यांचे स्वप्न होतं की भारतात प्रदूषण न करता धावणारी ऑटोमॅटिक कार असायला हवी. ऑटोमॅटिक कार हवी जाने प्रदूषण देखील कमी होईल शिवाय अपघातात देखील कमतरता येईल. मग काय शेतकरी पुत्राने स्वप्न बघितलं आणि ते सत्यात उतरवलं नाही असं होऊचं शकत नाही. हर्षल यांचे स्वप्न आज पूर्ण झाल आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच या कारची निर्मिती करण्यात आली आहे. मित्रांनो हे कार प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आली आहे. ही कार हायड्रोजन वायूवर धावणारी असून एक लिटर हायड्रोजन मध्ये ही कार तब्बल 250 किलोमीटर धावू शकणार आहे. एवढेच नाही तर ही कार पूर्ण हायटेक आहे या कारमध्ये ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग साठी एक संगणक देखील फिट करण्यात आला आहे.

ही कार बनवण्यासाठी हर्षल यांना तब्बल 25 लाख रुपये खर्च आला आहे. निश्चितचं आगामी काही दिवसात हर्षल यांनी तयार केलेली ही कार रस्त्यावर देखील धावताना दिसणार आहे. म्हणून तर आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांच्या पोराचा नादचं खुळा. खरंच हर्षल यांनी नाद खुळा कार्यक्रम केला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts