कृषी

नवरा बायकोची भन्नाट जोड…! पट्ठ्याने सरकारी नोकरींला राम दिला, बायकोला सोबत घेत सुरु केली मोत्याची शेती, आज तब्बल 20 लाखांची कमाई

Success Story: शेतीत (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितचं शेतीतुन लाखोंची कमाई (Farmer Income) करता येणे शक्य आहे. शेती व्यवसायात केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी बांधवांनी (Farmer) शेतीपूरक व्यवसाय सुरु केला तर शेतकरी बांधवांना हमखास लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.

मध्यप्रदेश मधील एका शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करत शेती व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. मध्यप्रदेशच्या होशंगाबाद जिल्ह्यातील सोहागपुर येथील मौजे रंगपुरचे रहिवासी शेतकरी अमित बमोरीया यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायातून वार्षिक वीस लाख रुपये कमाई करून दाखवली आहे. मित्रांनो खरं पाहता अमित एक सरकारी नोकरदार होते. अमित पीडब्ल्यूडी खात्यात नोकरी करत होते.

मात्र नोकरीत मन रमले नाही म्हणून अमितने नोकरी सोडून मोतीची शेती (Pearl Farming) सुरू केली. आज अमित पर्ल फार्मिंग मधून लाखों रुपये कमवत आहेत. त्यांच्या कामात त्यांच्या परिवाराचे देखील त्यांना अनमोल सहकार्य लाभत आहे. त्यांची पत्नी देखील त्यांना शेतीमध्ये मदत करत आहे.

अमित आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर बांधलेल्या तलावात मोत्यांची लागवड करत आहे. विशेष म्हणजे अमित (Successful Farmer) पर्ल फार्मिंग बरोबरच मत्स्यपालन आणि कुक्कुटपालनही करत आहेत. मित्रांनो एक शेतकरी साधारणपणे एक एकरातून वर्षाला फक्त 50 हजार ते 1 लाख कमवतो, पण अमितला त्याच्या एक एकर जमिनीतून 8 ते 10 लाख रुपये मिळतात.

अमित बामोरिया यांनी दावा केला आहे की, ते मध्य प्रदेशात मोत्यांची लागवड करणारे पहिले शेतकरी आहेत. अमित यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांनी (रामलाल बामोरिया) त्यांच्या शेतात 1982 मध्ये मत्स्यपालनासाठी एक तलाव बांधला होता. त्यांचे वडील दीर्घकाळापासून मत्स्यपालन करतात.  मग या तलावातून आणखी काय करता येईल असा विचार त्याने केला.

मग त्याने मोत्यांची शेती शिकून घेतली आणि 2016 मध्ये मोत्याची शेती सुरू केली. ते पुढे सांगतात की, आधी त्यांना दीड वर्षात मोत्यांच्या शेतीत 30 हजार खर्चून 1 लाख रुपयांचा नफा झाला होता. मोत्याच्या शेतीबाबत ते पुढे सांगतात की, मोत्याची शेती अगदी कमी खर्चात करता येते. 

एका शिंपल्यात दोन मोती तयार होतात. एका ऑयस्टरसाठी एका वर्षात किमान 40-50 रुपये आणि जास्तीत जास्त 100 रुपये एवढा खर्च असतो. ते म्हणतात की 10×10 म्हणजेच 100 चौरस फूट जमिनीवर 1000 ऑयस्टरची शेती करता येते. बाजारात या मोत्यांची किंमत सुमारे 300 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. त्यांच्याकडे दीड एकराचा तलाव असल्याचे ते सांगतात.

संपूर्ण कुटुंब एकत्र काम करते, घरी आहेत सर्व तज्ञ

अमितने सांगितले की, त्याचे वडील रामलाल बामोरिया अनेक वर्षांपासून मत्स्यपालन करत आहेत. त्याचे वडील आणि आई केसरबाई बामोरिया हे मासे, शेळी आणि कडकनाथ कोंबडी पाळण्यात तज्ञ आहेत. तसेच त्यांची पत्नी सुलक्षणा मोत्यांच्या कामात निपुण आहे.

20 लाखांची होते कमाई 

या सर्व प्रकारची शेती करून हे कुटुंब वर्षाला सुमारे 20 लाख रुपये कमावते. या सर्व गोष्टी ते करतात तसेच मोती संगोपनाचे प्रशिक्षणही देतात. तसेच मासे, मशरूम शेतीचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. सरकारनेही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. अमित बामोरिया यांना राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होलिस्टिक फार्मर पुरस्कारही मिळाला आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts