Success Story: मनात एखादी गोष्ट मिळवण्याची प्रबळ इच्छा असेल तर ती गोष्ट प्रतिकूल परिस्थितीत देखील साध्य करता येते. मात्र यासाठी आवश्यकता असते ती अपार कष्टाची आणि योग्य नियोजनाची. एखादी गोष्ट करण्याची जिद्द मनात असेल तर मग ती गोष्ट मिळवण्यासाठी वाटेत येणारा कितीही मोठा अडथळा अतिशय छोटा वाटतो. यूपीच्या अभय पटेलने देखील असेच करून दाखवले आहे.
अभय पटेल (Abhay Patel) ने प्रतिकूल परिस्थितीत दहावीच्या परीक्षेत चांगले नेत्रदीपक यश संपादन करून टॉपरच्या यादीत आपले नाव कोरले आहे. अभय पटेलने यूपी बोर्डाच्या 10वी परीक्षेत (ssc exam result) 576 गुण मिळवून टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. अभय पटेल हा यूपीच्या हरदोई येथे वास्तव्यास असून, त्याचे वडील शेतकरी (farmer) आहेत. शेतकरी पुत्र अभय त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या पालकांना देतो.
अभय यांनी शेतकऱ्याचा पोरगा (farmer son) कशापद्धतीने प्रतिकूल परिस्थितीत यशाला गवसणी घालू शकतो हे जगाला दाखवून दिले आहे. अभयने सांगितले की, कोरोना महामारी त्याच्यासाठी एक मोठा अडथळा बनली होती कारण की महामारीच्या काळात अभ्यास करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता होती आणि यासाठी अभयला खूप अडचण येतं होती.
यामुळे अभय ला दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करताना नानाविध समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र निश्चयाचा महामेरू शेतकरी पुत्र अभय यांनी या परिस्थितीला न घाबरता, खचून न जाता, मोठ्या जिद्दीने दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यास केला आणि आज अभयने राज्यात 10वा क्रमांक पटकावून त्यांचे व त्यांच्या शेतकरी आईबापांचे नाव संपूर्ण देशात रोशन केले आहे.
शेतकरी बापाचा लेक लई झाकं…!
मित्रांनो खरं पाहता, अभय हे शेतकरी पुत्र आहेत. अभय पटेल यांच्या वडिलांची त्यांच्या मूळ गावी सदरपूरमध्ये 10 बिघा जमीन आहे. त्यांचे वडील शेतीतूनच (farming) आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अभय आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य संघर्षमय आहे. पण अभय नावातच निर्भयता आहे. अभय यांनी अगदी आपल्या नावाप्रमाणे निर्भय होऊन, आपल्या मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. अभय यांनी संपूर्ण यूपीमध्ये 10वी बोर्ड वर्गात 10वी रँक मिळवून आपल्या आई-वडिलांचा गौरव वाढवला आहे.
शेतकरी पुत्राचं स्वप्न पण आहे लई नेक…!
अभयने आपल्या यशाबद्दल सांगितले की, यशासाठी आपण खूप अभ्यास केला पाहिजे असे मुळीच नाही, मात्र आपण जो काही अभ्यास करतो तो बाकी मन लावून केला पाहिजे, यामुळे यश नक्कीच मिळते. पटेल म्हणाले की, त्यांनी वैद्यकीय क्षेत्र निवडले असून डॉक्टर बनून त्यांना जनतेची सेवा करायची आहे.
मुलाच्या यशाने कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. निश्चीतच अभय यांचे यश आणि त्यांचे स्वप्न दोघेही कौतुकास्पद आहेत. शेतकऱ्याच्या पोराचे हे यश निश्चितच प्रेरणा देणारे आहे आणि यामुळे भविष्यात अभय प्रमाणे अनेक शेतकरी पोरं आपले नाव कमावतील यात तिळमात्रही शंका नाही.