Success Story : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे प्रयोगशील शेतकऱ्यांना देखील शेती नकोशी वाटू लागली आहे. मात्र देशात असेही अनेक लोक आहेत जे नोकरी करत असताना देखील शेतीकडे वळले आहेत आणि आपल्या नोकरीसोबतच शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधत आहेत.
आज आपण अशाच एका शेतकरी कुटुंबाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. भडगाव तालुक्यातील मौजे गुढे येथील सुभाष माळी हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मात्र त्यांनी विद्यादानाचं काम करत असतानाच त्यांनी काळ्या आईची देखील सेवा केली आहे. विशेष म्हणजे त्यांचे दोन्ही पुत्र जे की इंजिनियर आहेत ते देखील शेतीमध्ये कार्यरत आहेत.
वैभव आणि दिनेश असा दोघा मुलांची नावे असून दोघांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. माळी कुटुंबांने काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत आणि आपला ज्ञानाचा वापर करत सर्वप्रथम पीक पद्धतीत बदल करणे हेतू वीस गुंठे शेतजमिनीत ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली.
विशेष म्हणजे या विदेशी फळ पिकातून त्यांना साडेतीन लाखांच उत्पन्न मिळाल आहे. म्हणजेच एकरी जवळपास सात लाखांचे उत्पन्न त्यांना ड्रॅगन फ्रुट मधून मिळाले आहे. शाळेत विद्यादानाच काम केल्यानंतर जो काही वेळ वाचतो त्या वेळेत सुभाष माळी हाडाचे शेतकरी बनतात आणि शेतीमध्ये राबतात.
वैभव आणि दिनेश हे पूर्णवेळ शेती पाहतात. उस्मानाबाद येथे या दोघा भाऊंनी प्रत्यक्ष भेट देऊन ड्रॅगन फ्रुट शेती विषयी माहिती जाणून घेतली.
यानंतर त्यांनी गावी परतत आपल्या 20 गुंठे शेत जमिनीत सहा बाय दहा फूट अंतरावर सिमेंटचे पोल व ड्रॅगन फ्रुट साठी आवश्यक स्ट्रक्चर उभारणी केली. यानंतर ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्यात आली. 18 महिन्यानंतर जुलै ते जानेवारी असा फळबहार येण्याचा कालावधी.ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विशेष म्हणजे सुरुवातीला ड्रॅगन फ्रुट पासून कमी उत्पादन मिळते तरीदेखील माळी कुटुंबाने मिळालेले उत्पादन स्थानिक बाजारात हात विक्री केली आणि अवघ्या 18 महिन्यात वीस गुंठ्यातून साडेतीन लाख कमावले. निश्चितच माळी कुटुंबाने शेतीमध्ये केलेली ही कामगिरी कौतुकास्पद असून यामुळे इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.