कृषी

ओ शेठ तुम्ही नांदच केलाय थेट!! ‘या’ अवलिया शेतकऱ्याने अडीच लाख रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या आंब्याची केली यशस्वी लागवड; वाचा

Farmer succes story : भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) बारामाही शेती व्यवसायात (Farming) काबाडकष्ट करत असतात.

शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल देखील घडवत असतात. विशेष म्हणजे उत्पादनवाढीच्या (Farmers Income) अनुषंगाने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवित असतात. ओडिशाच्या (Odisha) बरगढ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील असाच एक नाविन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतीत राबवला आहे. या शेतकऱ्याने जगातील सर्वात महागड्या आंब्यांमध्ये गणल्या जाणार्‍या आंब्याच्या प्रजातीचे झाड वाढवण्याची किमया साधली आहे.

जगातील सर्वात महागडा आंब्याच्या यादीत असणाऱ्या आंब्याच्या यशस्वी लागवड करून या शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. या शेतकऱ्याने उत्पादित केलेला आंबा हा बाजारात लाखो रुपये दराने विकला जातो.

मित्रांनो ओडिशातील बारगढ जिल्ह्यातील मौजे निलाथर येथील शेतकरी सत्य नारायण यांनी जगातील सर्वात महागडा मियाझाकी जातीचा आंबा (Miyazaki Mango) लागवड (Mango Farming) यशस्वी करून दाखवण्याची अनोखी किमया साधली आहे.

मियाझाकी जातीचा हा महागडा आंबा सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात या अवलिया शेतकऱ्याला यश आले आहे. सर्वसाधारण बाजारात ते अडीच ते तीन लाख रुपये किलोने विकले जाते. मात्र, आता आंबा पिकवल्यानंतर सत्य नारायण यांनी आपल्या पिकलेल्या आंब्याचे मार्केटिंग करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे.

सत्यनारायण यांनी शेतीमध्ये केलेल्या या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल सत्य नारायण यांचा गौरव देखील करण्यात आला आहे. 50 वर्षाचे सत्य नारायण हे अशिक्षित शेतकरी असूनही शेती व्यवसायात कायम प्रयोगशील असतात.

या शेतकऱ्याने आपले औपचारिक शिक्षणही पूर्ण केलेले नाही, मात्र शेतीमध्ये असलेले त्यांचे कसब इतर शेतकऱ्यांना नक्कीच लाजवणारे आहे. सत्य नारायण यांनी हा आंबा बांगलादेशातून आणल्याचे त्यांनी सांगितले.

हा आंबा पिकवण्यात यश आल्याचा त्यांना खूप आनंद आहे. मात्र आंबा विकण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. चंद्रू सत्य नारायण हे बारगड जिल्हा मुख्यालयापासून 130 किमी अंतरावर असलेल्या नीलाथर गावात राहतात.

तीन वर्षांपूर्वी त्यांनी बांगलादेशातून मियाझाकी आंब्याच्या बिया आणल्या होत्या आणि आपल्या शेतात त्याची लागवड केली होती. निश्चितच जगातील महागड्या आंब्यांपैकी एक असलेला मियाझाकी आंबा उत्पादित करून सत्यनारायण यांनी इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श रोवला आहे.

या शेतकऱ्याची ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असून यामुळे इतर शेतकऱ्यांना मोठी प्रेरणा मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts