कृषी

Successful Farmer: नाशिकचा ‘हा’ पट्ठ्या रेशीम शेतीतुन कमवीत आहे महिन्याकाठी लाखों, वाचा शेतकऱ्याची यशोगाथा

Successful Farmer: नाशिक (Nashik) नाव ऐकलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते द्राक्षांच्या बागांचे (Grape Orchard) मनमोहक दृश्य. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे आणि कांद्याचे उत्पादन (Onion Production) घेतले जाते.

यामुळे नाशिक जिल्ह्याला वाईन सिटी तसेच कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. मात्र याचं जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्याने विकासाचा नवा मार्ग शोधत रेशीम शेतीच्या (Silk farming) माध्यमातून लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या कृष्णानगर येथील सखाहरी जाधव यांनी काळाच्या ओघात शेतीव्यवसायात मोठा आमूलाग्र बदल केला आहे.

जाधव यांनी पारंपरिक पीकपद्धतीला फाटा देत रेशीम शेती (Silk Cultivation) सुरु केली असून ते सध्या या शेतीतुन महिन्याला जवळपास 2 लाखांची कमाई करत आहेत.

त्यांनी शेतीत केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जाधव यांनी आपल्या दीड एकर शेतीत पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत रेशीम शेती सुरू केली.

पारंपरिक पीक पद्धतीत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खालावू लागल्याने जाधव यांनी रेशीम शेतीचा मार्ग निवडला.

खरं पाहता राज्यात अलीकडे रेशीम शेती मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. शेतकरी बांधव रेशीम शेतीच्या माध्यमातून चांगली तगडी कमाई देखील करत आहेत.

जाधव यांनी देखील रेशीम शेतीतुन चांगले बक्कळ उत्पन्न कमवून इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवला आहे.आपल्या राज्यातील मराठवाड्यात प्रामुख्याने रेशीम शेती बघायला मिळते.

मात्र असे असले तरी शेतीव्यवसायात जरा हटके करण्याच्या उद्देशाने जाधव यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज यशस्वी देखील ठरले आहेत.

आजच्या घडीला जाधव रेशीम शेतीतुन महिन्याला 1 लाख 80 हजाराची कमाई करत असून त्यांच्या या कार्याची अनेक सहकारी संस्थांनी देखील दखल घेतली आहे.

जाधव यांना कृषी मंत्री दादा भुसे यांनी आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे शिवाय जाधव यांनी रेशीम शेतीत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना रेशीम संचालनालयाचा रेशमश्री पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. निश्चितच जाधव यांनी रेशीम शेतीत केलेली ही दमदार कामगिरी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts