Successful Farmer: भारत हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशात शेती (Farming) हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये नुकसान सहन करावे लागत असल्याने देशातील अनेक शेतकरी बांधव आता शेती पासून दुरावत चालल्याचे चित्र आहे.
एवढेच नाही तर शेतकरी बांधव आता आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या कंपनीत नोकरी करावी पण शेती करू नये अस स्वप्न पाहत आहेत. मात्र हरियाणा राज्यातील एका रिटायर्ड फौजीने रिटायरमेंट नंतर शेती करून शेतीतून लाखों रुपये उत्पन्न (Farmer income) कमावण्याची किमया साधली आहे.
भारतीय सैन्यात 16 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर हरियाणातील (Hariyana) झज्जर जिल्ह्यातील धाना गावात राहणारा अनिल जेव्हा त्याच्या गावी पोहोचला तेव्हा शेतीची पद्धत पाहून तो थक्क झाला. पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर केला जात होता. यानंतर अनिलने नैसर्गिक शेती करण्याचे नियोजन केले.
या अनुषंगाने अनिल अनेक लोकांना भेटले, अनेक कृषी तज्ज्ञांशी बोलले आणि आजच्या घडीला अनिल फळे, भाजीपाला आणि औषधी वनस्पतींची लागवड करून वर्षाला पाच लाख रुपये कमावत आहेत. अनिल आपली सर्व पिके वेळेवर पेरतात. अनिल पहाटे 5 वाजता उठतात आणि आपल्या शेतात कामाला लागतात.
नैसर्गिक शेतीसाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, पण आर्मी मॅन असल्याने अनिलला ते फारसे अवघड वाटले नाही. 2015 मध्ये गहू, बाजरी, कापूस, मोहरी, मूग, हरभरा, जव ही मुख्य पिके आणि हंगामी भाजीपाला, ऊस आणि चारा ही सह-पिके म्हणून शेती करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या शेताच्या आसपास फळे आणि औषधी वनस्पती वाढवण्यास सुरुवात केली.
आता ही झाडे त्याच्या उत्पन्नाचा चांगला स्रोत बनली आहेत. नैसर्गिक शेतीचे फायदे सांगताना अनिल म्हणाले की, नैसर्गिक शेतीमध्ये खत, बियाणे हे घरगुती आहेत. यामुळे उत्पादन खर्चात लक्षणीय घट होते आणि नफा वाढतो.
पिके 2 ते 3 पट अधिक भावाने विकली जातात
अनिलच्या म्हणण्यानुसार, तो गुरुग्राममध्ये आपली पिके विकतो. जिथे काही लोक सतत त्यांच्याशी जोडले जातात आणि त्यांच्या गरजेनुसार पिकांची खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यालाही आपल्या पिकाचा कोणी खरेदीदार येईल की नाही याची चिंता करावी लागत नाही. खरेदीदार त्यांच्याशी आगाऊ संपर्क करून किंमत ठरवतात.
शेतीतून नफा
उत्पन्न वाढविण्यासाठी जामुन, आवळा, डाळिंब, बेर, खजूर, पेरू, केळी, चिकू, कडुलिंब आणि अश्वगंधा, लेमन ग्रास, अजवाई पत्ता, या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. अशा तऱ्हेने अनिल सेंद्रिय शेतीतून जवळपास पाच लाख कमवत आहेत.