Successful Farmer: प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेल ही गळे ही म्हण आपण नेहमीचं ऐकतो आणि आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो पण या म्हणीचा खरा अर्थ कागल तालुक्याच्या प्रयोगशील शेतकरी (Farmer) प्रकाश आनंदा पाटील सिद्ध करून दाखवला आहे.
प्रकाश दादांनी शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल करत, योग्य नियोजनाची सांगड घालत आणि अपार कष्टाच्या जोरावर खडकाळ जमिनीवर (Barren Farmland) शेती कसून दाखवली आहे.
विशेष म्हणजे या माळरानावर त्यांनी जिरेनियम (Geranium) या औषधी वनस्पतीच्या शेतीतून (Medicinal plant farming) लाखों रुपये उत्पन्न (Farmers income) कमावण्याची किमया देखील साधली आहे.
कागल तालुक्यातील मौजे अर्जुनी येथील प्रकाश आनंदा पाटील यांना नेहमीच शेतीमध्ये जरा हटके प्रयोग करावेसे वाटतं असे. मात्र खडकाळ जमिनीत काय करावे असा प्रश्न त्यांच्या पुढ्यात उभा राहिला.
मग काय प्रकाश दादांनी त्यासाठी शोधाशोध सुरू केली आणि मग त्यांच्या मनात सुगंधी औषधी वनस्पतीच्या लागवडीचा विचार आला. या अनुषंगाने त्यांनी जिरेनियम शेती (Geranium Farming) करण्यास सुरवात केली.
खरं पाहता, कोल्हापूर जिल्हा ऊस या नगदी पिकाच्या शेतीसाठी संपूर्ण राज्यात ओळखला जातो. जिल्ह्यातील कागल तालुका ऊस उत्पादनात अग्रेसर आहे.
मात्र मौजे अर्जुनी येथील उच्चविद्याविभूषित प्रकाश दादा यांनी शेतीमध्ये जरा हटके आणि कमी पाण्यात व अल्प कालावधीत काढण्यासाठी येणाऱ्या पिकाची शेती करण्याचा निश्चय केला.
यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जिरेनियम शेतीची माहिती मिळाली. सोशल मीडियातून जिरेनियम शेती ची माहिती घेतल्यानंतर प्रकाश दादा यांनी जिरेनियमची लागवड केली.
याकामी प्रकाश दादा यांना त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती शुभांगी प्रकाश पाटील यांची देखील मदत मिळाली. जिरेनियमची रोपे त्यांनी पुण्यातून व नगरमधून मागवली.
रोपे मागवल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने जिरेनियम ची लागवड करण्यात आली. ज्या खडकाळ जमिनीवर कधी काळी दगड गोटे सोडून काहीचं नव्हते त्या माळरानावर प्रकाश दादा यांनी आपल्या अपार कष्टाच्या जोरावर सुगंधी औषधी वनस्पतीचा मळा फुलवला असून यामुळे त्यांच्या आयुष्यात देखील सुगंध दरवळत आहे.
आता प्रकाश दादा जिरेनियम शेतीतून वर्षाकाठी चार लाखांची कमाई करत आहेत. विशेष म्हणजे जिरेनियम लागवडीसाठी खर्चदेखील नगण्य आहे.
प्रकाशदादा यांच्या मते ऊस शेतीचा 20 टक्के खर्च हा जिरेनियम शेती साठी येतो. एवढेच नाही तर जिरेनियम शेती साठी मॅनपावर देखील अतिशय कमी लागते. यामुळे मजुरीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश दादा यांनी जिरेनियमची दोन हंगामातील उत्पादन घेतले आहे. यासाठी त्यांनी तेल कंपनीशी करार केला आहे. कंपनी पिकांची खरेदी करून स्वखर्चाने घेऊन जात असल्याचे पाटील नमूद करतात.
निश्चितच प्रकाश दादा यांनी शेतीमध्ये केलेला हा बदल त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला असून भविष्यात इतर शेतकरी देखील प्रकाश दादा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जिरेनियम शेती ची लागवड करतील एवढे नक्की.