Successful Farmer : भारतात गेल्या काही वर्षांपासून मशरूम शेती (Mushroom Farming) मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे. देशातील प्रयोगशील शेतकरी बांधव (Farmer) आता मशरूम (Mushroom Crop) शेतीतून चांगली कमाई (Farmer Income) करत आहेत.
हरियाणा राज्यातील पाणीपत जिल्ह्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील मशरूम शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधली आहे. या अवलियाने सत्तावीस वर्षांपूर्वी मशरूम शेतीला सुरुवात केली आणि हा अवलिया गेल्या 27 वर्षांपासून मशरूम शेतीच्या माध्यमातून चांगली कमाई देखील करत आहे.
हरियाणा मधील पानिपत येथील शेतकरी जितेंद्र मलिक गेल्या 27 वर्षांपासून बटन मशरूमची लागवड करत आहेत. यामुळे जितेंद्र मलिक परिसरात मशरूम ज्ञान या नावाने ओळखले जात आहेत. निश्चितच सलग 27 वर्ष मशरूम शेतीतून चांगली कमाई करत असल्याने जितेंद्र मलिक इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
जितेंद्र मलिक 1995 पासून मशरूमची लागवड करत आहेत. त्यांनी फक्त 2 शेड्स उभारून मशरूम शेतीला सुरुवात केली. पुढे मशरूम शेती चांगली कमाई होऊ लागली मग काय हळूहळू त्यांनी या शेतीमध्ये नवनवीन डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. आजच्या घडीला जितेंद्र यांच्याकडे मशरूम शेती करण्यासाठी 10-15 शेड्स आहेत.
जितेंद्रला परिसरातील लोक ‘मशरूम मॅन’ म्हणून ओळखतात, कारण तो यशस्वी पद्धतीने मशरूम पिकवत असून चांगला नफा कमावतो आहे. जितेंद्र बटन मशरूमची (Button Mushroom) लागवड करतात, ही एक मशरूमची लोकप्रिय जात आहे. जितेंद्र सांगतात की मशरूमची लागवड इतर पिकांपेक्षा थोडी वेगळी आहे. हे फक्त थंड हंगामात घेतले जाते, उन्हाळ्यात नाही. कोणत्याही ठिकाणचे तापमान जास्त असल्यास तेथे एसी लावावा लागेल. दरवर्षी हिवाळ्यात याची लागवड केली जाते.
मशरूम शेती साठी लागणारा उत्पादन खर्च
जितेंद्र मलिक सांगतात की, मशरूमच्या लागवडीसाठी शेड बांधावे लागते आणि शेड बांधण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च येतो. शेड बांधल्यानंतर दरवर्षी हिवाळ्यात मशरूमची लागवड करता येते.
कंपोस्ट मशीन बनवले आहे बर
जितेंद्र हे प्रगतीशील आणि कल्पक शेतकरी आहेत. त्यांनी 2006 मध्ये एक कंपोस्ट मशिन तयार केले, जे एकटे 60-70 कामगारासारखे काम करते. त्यामुळे मशरूम शेतीसाठी लागणारा खर्च किती कमी होईल हे तुम्ही समजू शकता. हे यंत्र मशरूमसाठी खत मिसळून उत्तम दर्जाचे कंपोस्ट तयार करते. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळते.
मशीनची वैशिष्ट्य जाणून घ्या
जितेंद्र यांच्या मते, त्यांच्या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे ते कच्च्या आणि पक्क्या दोन्ही जमिनीवर वापरता येते. हे लोडिंगचे काम देखील करते. ही प्रणाली खतातून अमोनिया सोडण्यासाठी डिझाइन केलेली आहे. यंत्राचा वापर करून कंपोस्टमध्ये गुठळ्याही तयार होत नाहीत. याशिवाय पाणी किंवा कीटकनाशक फवारण्याची व्यवस्थाही यंत्रात आहे.
राष्ट्रपतींनीही गौरव केला आहे
जितेंद्र मलिक यांना त्यांची खास मशीन बनवल्याबद्दल अनेक सन्मान मिळाले आहेत. यामध्ये सोलनच्या मशरूम संचालनालय यांच्याकडून मिळालेल्या पुरस्काराचा समावेश आहे तसेच कर्नाटकच्या ICAR कडून मिळालेल्या पुरस्कारांचा समावेश आहे. याशिवाय जितेंद्र मलिक यांना 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पुरस्कारही मिळाला आहे.
पॅकेजिंग कसे केले जाते?
जितेंद्र सांगतात की त्यांच्या शेतात मशरूम तोडण्याचे काम संध्याकाळी 8 वाजता सुरू होते आणि सकाळी 6 वाजेपर्यंत मशरूमची पाकिटे तयार होतात. 200 ग्रॅमची पाकिटे तो बनवतो, जी बाजारात 20-25 रुपयांना विकली जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या वेळी मशरूमचे एक पॅकेट 100 रुपयांना विकले जाते.