Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर शेती (Agriculture) करोडो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमवून देणारे एक शाश्वत साधन बनू शकते. मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीला (Traditional Farming) फाटा देत आता आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे.
यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढणार असल्याचा दावा जाणकार करतात. योग्य वेळी योग्य पद्धतीने शेती केली तर शेती सोनचं देते. आज आम्ही तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगणार आहोत जिने MBA चे शिक्षण घेतले आणि तिला एका चांगल्या कंपनीत नोकरी (Job) मिळाली पण नंतर नोकरी सोडून स्वतःची सेंद्रिय शेती (Organic Farming) सुरु केली.
मूळची केरळ राज्यातील गीतांजली (women farmer) लहानपणापासूनच डोंगरात शेती पाहत आली आहे. गीतांजलीला अगदी लहानपणापासून शेतीची प्रचंड आवड आहे. मात्र असे असले तरी उच्चशिक्षण घेतल्यानंतर गीतांजलीने काही काळ नोकरी केली. गीतांजली यांच्या मते, एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी टीसीएस या बहुप्रतिष्ठित आयटी कंपनीत नोकरी सुरू केली. अपार बुद्धिमत्तेची धनी गीतांजली लहानपनापासून जरा हटके करण्याच्या विचारात होती.
तिला नेहमीच काहीतरी नवीन करण्याची आवड होती आणि मग शेवटी याच आवडीपोटी तीने यावेळी सेंद्रिय शेती सुरू केली. विशेष म्हणजे गीतांजली यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी अधिक फायद्याचा ठरला आहे. लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी सोडली मात्र आज गीतांजलीला सुमारे 20 कोटींचा नफा मिळत आहे.
सेंद्रिय शेती सुरू करण्यासाठी गीतांजलीला संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा मिळाला आणि हळूहळू तिला सेंद्रिय भाजीपाला विकण्याचा सल्ला मिळाला. गीतांजली यांनी त्यांचा सेंद्रिय भाजीपाला विक्री करण्यास सुरवात केली आणि गीतांजलीच्या सेंद्रिय भाज्यांची मागणी इतकी झपाट्याने वाढली आहे की आज त्यांचे 16 हजारांहून अधिक ग्राहक आहेत.
आधुनिक सुविधांचा लाभ घेत गीतांजलीने मोबाईल अॅपद्वारे सेंद्रिय भाजीपालाही लोकांना त्यांच्या दारात उपलब्ध करून दिला आहे. आज गीतांजली त्यांच्या या व्यवसायातून दरवर्षी सुमारे 20 कोटी रुपये कमावत आहे. निश्चितच गीतांजली यांनी शेतीमध्ये केलेली ही भन्नाट कामगिरी इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे.
शेतीमध्ये योग्य नियोजन आखले गेले तर कोट्यावधी रुपये देखील अगदी सहजतेने कमवता येतात हे गीतांजली यांनी दाखवून दिले आहे. खरं पाहता नवयुवक शेतकरी पुत्र आता नोकरीकडे अधिक आकृष्ट होत असल्याचे चित्र आहे, मात्र गीतांजली यांनी टीसीएस सारख्या नामांकित कंपनीतली नोकरी सोडून शेती करत करोडो रुपये कमवून दाखवले आहेत. निश्चितच शेतीपासून दुरावत चाललेल्या नवयुवकांसाठी गीतांजली आदर्श ठरणार आहेत.