Successful Women Farmer: शेती (Farming) हा काही लोकांसाठी रोजगार आणि काहींसाठी छंद आहे. खरं पाहता भारतातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर अवलंबून असून ग्रामीण भागातील लोक ही शेती व्यवसायात फार पूर्वीपासून गुंतलेली आहेत.
आता हळूहळू देशातील तरुणाई शेतीकडे आकृष्ट होत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतीकडे आकर्षित होत आहे. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षण घेतलेली तरुणाई देखील शेती करण्यासाठी पुढे सरसावत आहे.
विशेष म्हणजे शेतीमध्ये उतरलेली ही तरुणाई शेतीतून लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमयाही साधत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिने पीएचडीचे शिक्षण सोडून शेती करायला सुरुवात केली आहे आणि शेतीतून आजच्या घडीला चांगली कमाई करत आहे.
आज ती केवळ शेतीतून लाखो रुपये कमवत आहे. मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील इंशा रसूल या महिला शेतकऱ्याने (Farmer) कोरियामध्ये पीएचडी सोडली. 2018 मध्ये ती (Women Farmer) काश्मीरमध्ये परतली. येथे येऊन त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली.
काश्मीरमध्ये परतल्यानंतर इंशा रसूलने अपार मेहनत घेतली आणि स्वतःला शेतीत झोकून दिले आणि आज त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे. सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्याची इच्छा असलेली इंशा रसूल दक्षिण कोरियातील एका विद्यापीठातून मॉलिक्युलर सिग्नलिंगचे शिक्षण घेत होती. पण आज त्यांच्याकडे फार्म टू फोर्क ब्रँड आहे.
जो त्याने अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर बनवला. इंशाने तिच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी काम करायला सुरुवात केली तेव्हा तिच्याकडे वडिलोपार्जित साडेतीन एकर जमीन होती. त्यांचे संपूर्ण कुटुंब या जमिनीवर पूर्णपणे अवलंबून होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा त्यांनी काम सुरू केले तेव्हा त्यांनी सर्वात आधी कामगारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.
तसेच पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी केली. त्यानंतर शेती सुरू केली. या प्रयोगादरम्यान तिला अपयश देखील आले पण आलेल्या अपयशाला पचवून हार न मानता तीने शेती सुरूच ठेवली. पीक वाढवण्यासाठी केलेले संशोधन पुरेसे नाही हे तिला माहीत होते. मग काय वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाचे प्रयोग त्यांनी सुरू केले.
त्यांना यासाठी काही महिने लागले. इन्शाच्या म्हणण्यानुसार, ती जितकी यशस्वी झाली आहे त्यापेक्षा जास्त ती अपयशी ठरली आहे. कारण कधी पीक उगवत नाही, तर कधी खत काम करत नाही. अनेक वेळा असे घडते की शेतात खूप पाणी साचले किंवा बियाणे चुकीच्या हंगामात पेरले गेले तर त्यांना नुकसान सहन करावे लागे.
त्यांचा हा प्रयोग सहा महिन्यांहून अधिक काळ चालल्याचे त्यांनी सांगितले. पण त्यांनी हार मानली नाही आणि आज ते यशस्वी शेतकरी आहेत. स्ट्रॉबेरीच्या लागवडीमुळे प्रभावित झालेली, इंशा रसूल बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची माजी विद्यार्थिनी आहे. ती हिरवीगार आणि कमी तापमान असलेल्या अनेक ठिकाणी राहिली आहे.
काश्मीर, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये राहिल्यानंतर ती दक्षिण कोरियाला गेली, जिथे हवामान अधिक आनंददायी होते. ती सांगते की ती शेतकरी कुटुंबातील आहे. मुलांच्या शैक्षणिक उपक्रमादरम्यान, त्यांना स्ट्रॉबेरी फार्मला भेट देण्याची संधी मिळाली जिथून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. या कामात पतीने तिला पूर्ण साथ दिली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुमारे आठ लाख रुपये कमावल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी फ्रेंच बीन्स आणि मटार तसेच स्वीट कॉर्न आणि टोमॅटोची लागवड केली होती. विशेष म्हणजे, त्याच्या स्वत:च्या ब्रँड नावाखाली, इंशाने भारतभर विदेशी भाज्या आणि लोणचे यांसारखी मूल्यवर्धित उत्पादने विकण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांसोबत सहकार्य केले आहे. याचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही होत आहे.