कृषी

Sugarcane Farming : ऊस बागायतदारांनो लक्ष द्या! ऊस पिकात ‘हे’ काम करा, लाखोंची अतिरिक्त कमाई होणारं, वाचा सविस्तर

Sugarcane Farming : मित्रांनो संपूर्ण भारत वर्षात ऊस या पिकाला नगदी पिकाचा (Cash Crop) दर्जा प्राप्त आहे. आपल्या देशातील अनेक राज्यात उसाची लागवड (Cultivation Of Sugarcane) मोठ्या प्रमाणात केली जाते.

आपल्या महाराष्ट्रात देखील उसाची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात आढळते. संपूर्ण भारत वर्षात उत्तर प्रदेश राज्यात उसाची लागवड सर्वाधिक आहे. येथील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात (Kharif Season) उसाची लागवड केली आहे.

आपल्या राज्यात देखील ऊसाची शेती प्रामुख्याने केली जात आहे. सध्या उसाचे पीक (Sugarcane Crop) झपाट्याने विकसित होत असून उसाचे पीक व्यवस्थापनही (Sugarcane Crop Management) शेतात केले जात आहे.

दरम्यान, आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यासाठी नवीन कल्पना शोधली आहे. मित्रांनो ऊस उत्पादक बागायतदारांनी पिकांच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या शेतीत टोमॅटो, बटाटे, सिमला मिरचीची लागवड सुरू केली आहे.

म्हणजेच शेतकरी बांधवांनी उसाच्या पिकात आंतरपीक (Intercroppingघेण्यास सुरुवात केली आहे. जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना उसाच्या पिकात आंतरपीक घेण्याचा सल्ला देत आहेत. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे ऊस हे एक दीर्घ कालावधीच पिक आहे अशा परिस्थितीत या पिकात आंतरपीक घेतल्यास शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

ऊस पिकासह भाजीपाला लागवड

ऊस पिकात आंतरपीक म्हणून ऊस उत्पादक शेतकरी बांधव भाजीपाल्याचे चांगले उत्पादन घेऊ शकता. या पद्धतीने शेती करताना खते, कीटकनाशके, सिंचन आणि व्यवस्थापन यावर वेगळा खर्च करावा लागत नाही, तर ऊस पिकामध्ये व्यवस्थापनाची कामे करताना भाजीपाला पिकांचीही काळजी घेतली जाते.

सह-पिकाचा किंवा आंतरपिकाचा खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा ऊस साखर कारखान्यांमध्ये विकला जातो आणि शेतकऱ्यांना त्यांची देणी मिळण्यास बराच वेळ लागतो. दरम्यान, उसासह लागवड केलेल्या भाजीपाल्याची पिकेही उत्पादन देण्यास तयार होतं असून, ती मंडईत विकली जातात आणि शेतकऱ्यांना रोख मोबदला मिळतो. यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक व कौटुंबिक खर्च भागवण्यास मदत होते.

ऊस पिकात भाजीपाला लागवड करा 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हवे असल्यास ऊस पिकासह बटाटे, टोमॅटो, सिमला मिरचीची लागवड करता येते. या भाज्या कमी काळजीतही चांगले उत्पादन देतात. याशिवाय तुम्ही भेंडी, आर्वी, वाटाणा, मसूर या पिकांची उसात आंतरपीक म्हणून लागवड करू शकतात.

आणि भाजीपाला पिक जसे की झुचीनी, खरबूज, काकडी, भोपळा आणि शेंगायुक्त भाज्यांची लागवड करू शकता. शेतकऱ्यांना हवे असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ते ऊस पिकासह कडधान्य व तेलबिया पिकेही लावू शकतात. या पिकांची लागवड करून ऊस पिकाचा खर्च वसूल होतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts