Onion Price Ahmednagar : श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव फाटा येथील खासगी चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीत दसरा सणादिवशी झालेल्या लिलावात कांद्याला ५५५५ रुपये क्विंटल भाव मिळाला.
कांद्याला चांगला दर मिळत असल्याने येथील बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. येथे दर मंगळवार, शुक्रवार व रविवारी कांदा लिलाव होतात.
मंगळवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला ५५५५ रुपये भाव मिळाला. समितीत १४ हजार कांदा गोण्यांची आवक झाल्याचे चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती व्यवस्थपक शिवाजी भोस यांनी सांगितले.
मोठा कांदा ४५०० ते ५२००, मध्यम ४००० ते ४५००, गोल्टी ३५०० ते ४०००, दोन नंबर गोल्टी ३००० ते ३५०० रुपये भाव मिळाला. श्रीगोंदे तालुका कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो,
पण कांदाउत्पादक शेतकऱ्यांना कधी न्याय मिळाला नाही. सामाजिक बांधिलकीतून वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भुसार, कडधान्यास चांगला भाव मिळत आहे.