अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Whether News :-सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. पण वाढत्या उन्हाचा तडाका पिकांवर दिसू लागला आहे.
अंतिम टप्प्यात आलेल्या पिकाकडे दुर्लक्ष झाले तर खरिपात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून स्प्रिंक्लरचाच आधार घेतला जात आहे.
मराठवाड्यातही सूर्य आग ओकत असल्याचे चित्र आहे.तर नांदेड जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.त्यामुळे वाढत्या तापमानाचा धोका निर्माण झाला आहे.
त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आसून उत्पादनावर काय परिणाम होणार का या चिंतेत शेतकरी आहेत. सध्या सोयाबीन फूल लागण्याच्या अवस्थेत असून आता काळजी घेतली तरच उत्पादनात देखील वाढ होणार आहे.
त्यासाठी कृषी तज्ञांच्या मते स्प्रिंक्लरचा वापर करुनच पाणी देणे गरजेचे आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी दिवसा पाणी देण्याऐवजी संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळी पाणी दिल्यास त्याचा अधिक फायदा होणार आहे.
स्प्रिंक्लरमुळे पाण्याचा अपव्यय तर होत नाही. शिवाय सातत्याने पाणी सुरु राहल्याने जमिनीतील ओल टिकून राहण्यास मदत होते. आता काळजी घेतली तरच उत्पादनात वाढ होणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.