Farmer Scheme : हे चालू वर्षे निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
सत्तेत असलेल्यानी देखील सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी आता वेगवेगळे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच केंद्रातील मोदी सरकार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांना साधण्याचा मोठा डाव खेळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या रकमेत मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
वास्तविक केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास एका महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. दरम्यान मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट राहणार आहे. यामुळे या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला खुशी करण्यासाठी विविध निर्णय घेतले जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेत आता बदल होणार आहे. सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन हप्ते दिले जात आहेत. मात्र यामध्ये आता मोठा बदल होणार असून पात्र शेतकऱ्यांना चार हप्ते दिले जातील असा दावा केला जात आहे.
म्हणजेच दोन हजार रुपयांचे चार हप्ते असे एकूण आठ हजार रुपये या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मिळू शकतात. अर्थातच 6000 रुपयांची रक्कम दोन हजार रुपयांनी वाढणार आहे. तसेच काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत 50 टक्क्यांपर्यंत ची वाढ होऊ शकते असा दावा होत आहे.
सध्या स्थितीला दिल्या जाणाऱ्या दोन हजार रुपयांच्या हप्त्यात एका हजाराची वाढ होईल अशा तऱ्हेने तीन हजार रुपयांचे तीन हप्ते एका वर्षात पात्र शेतकऱ्यांना मिळतील असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे.
म्हणजे पीएम किसान योजनेची 6000 रुपयाची रक्कम 3 हजाराने वाढेल आणि ही रक्कम 9 हजार रुपये होईल असा दावा होत आहे. त्यामुळे आता पीएम किसान योजनेचे पैसे दोन हजार रुपयांनी वाढतात कि 3 हजार रुपयांनी हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.