Categories: कृषी

Farmer Success Story: एमबीए केले परंतु नोकरी न करता धरली शेतीची वाट आणि वार्षिक नफा कमवत आहे 25 लाख! वाचा या शेतकऱ्याच्या शेतीची कथा

Farmer Success Story:- सध्या बरेच जण आपण पाहतो की प्रत्येकाची इच्छा असते की चांगले उच्चशिक्षण घ्यावे आणि चांगल्या पॅकेजेची नोकरी मिळाली की आयुष्यात सेटल होऊन निश्चिंत आयुष्य जगावे व हिच साधारणपणे मनस्थिती प्रत्येकाची आपल्याला दिसून येते. तसे पाहायला गेले तर मुल अगदी लहान असल्यापासून पालकांची अशीच इच्छा असते.

तसेच पुढे जाऊन शिक्षण घेत असताना अनेक तरुण देखील या पद्धतीचे स्वप्न पाहत असतात. परंतु यामध्ये काही तरुण असे असतात की शिक्षण तर पूर्ण करतातच परंतु नोकरी न करता एखाद्या व्यवसायामध्ये नसीब आजमवतात व यशस्वी देखील ठरतात.

अगदी याच पद्धतीने बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील अभिनव वशिष्ठ यांनी एमबीए सारखी मोठी पदवी मिळवली. परंतु नोकरी न करता या तरुणाने शेतीला प्राधान्य दिले व आज त्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करण्यामध्ये अभिनव हे यशस्वी झालेले आहेत.

 नोकरी करता धरली शेतीची वाट

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील शेखपुरा जिल्ह्यातील अभिनव वशिष्ठ हे गेल्या 19 वर्षांपासून शेती करत असून जर आपण त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी एम कॉम पूर्ण केले आणि त्यासोबतच एमबीएपर्यंत देखील शिक्षण पूर्ण केलेले आहे.

एवढे उच्च शिक्षण घेतल्यानंतर देखील नोकरी करण्याऐवजी त्यांनी शेती करण्याला प्राधान्य दिले व आज याच शेतीतून अभिनव वशिष्ठ यांनी लाखोंची कमाई करण्यामध्ये यश मिळवलेले आहे.

विशेष म्हणजे जेवढा पैसा ते नोकरीत कमवू शकले नसते तेवढा पैसा ते शेतीच्या माध्यमातून कमावत आहेत. यांच्याकडे 35 एकर शेती असून त्यांची चार एकर मध्ये आंब्याची बाग आणि  एक बिघा क्षेत्रात दोन तलाव बांधले आहेत.

 औषधी वनस्पतींच्या लागवडीने नसीब चमकले

 अभिनव हे शेती सोबतच पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन व्यवसाय देखील करतात. पशुपालन व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांच्याकडे आज 25 गाई आणि चार म्हशी असून त्या माध्यमातून दूध व्यवसायातून ते चांगला नफा मिळवत आहेत.

अगोदर त्यांच्या शेतामध्ये तांदूळ तसेच गहू व इतर कडधान्य इत्यादी पारंपरिक पिकांचे लागवड केली जात होती. परंतु त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर औषधी वनस्पतींची लागवड सुरू केली पारंपारिक पिकांच्या तुलनेत त्यांच्या नफ्यात अनेक पटींनी वाढ झाली.

यामध्ये त्यांनी सुगंधी वनस्पतींच्या लागवडीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला. सुगंधी वनस्पतींमध्ये त्यांनी लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा, पुदिना, मेंथा, सिट्रोनेला आणि तुळसची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. एवढेच नाही तर त्यांनी पाच ते सहा शेतकरी मिळून एक संघटना स्थापन करून हळूहळू संपूर्ण बिहार राज्यात या सुगंधी वनस्पतींच्या रोपांचे वाटप देखील केले आहे.

सुगंधी वनस्पतींची लागवड केल्यानंतर युनिट द्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाते. या सुगंधी वनस्पतींवर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी 2005 मध्ये पाच लाख रुपये खर्च करून युनिटची खरेदी केली आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करिता शासनाकडून मदत मिळाली.

 वार्षिक मिळवत आहे वीस ते पंचवीस लाखांचा नफा

 वर्षाचा खर्च आणि मिळणारा नफा याबाबत माहिती देताना अभिनव यांनी म्हटले की, सुगंधी वनस्पतींच्या लागवडीला फारसा खर्च येत नाही. एकदा का तुम्ही याचे रोप किंवा बियाणे लागवड केले की सात ते आठ वर्ष पुन्हा लागवडीची गरज भासत नाही.

साधारणपणे एका वर्षात 25 ते 30 हजार रुपये लागवडीसाठी खर्च येतो व त्यामुळे तुम्हाला 70 ते 75 हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यासोबतच त्यांनी एक बिघा क्षेत्रात मत्स्य शेतीसाठी दीड लाख रुपये खर्च केलेला आहे. तसेच दुग्ध व्यवसायात देखील कमी खर्चात ते चांगला नफा मिळवत आहे.

दररोज दोनशे लिटरचे दुधाचे उत्पादन त्यांच्या गोठ्यातून मिळते. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर शेती तसेच मत्स्य पालन व दुग्ध व्यवसायातून वर्षाला अभिनव वशिष्ठ यांना वीस ते पंचवीस लाख रुपयांचा नफा मिळतो असे देखील त्यांनी सांगितले.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts